भारताची दोन वेळेची ऑलम्पिक पदक विजेती स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले आहे. महिलांच्या एकेरीत तिने ही कामगिरी करून दाखवली. सिंधूने सोमवारी (८ ऑगस्ट) अंतिम फेरीत कॅनडाच्या मिशेल ली हीचा २१-१५, २१-१३ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला आहे.
पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिचे हे कॉमनवेल्थ गेम्समधील पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे. तिने या स्पर्धेत सुरूवातीपासूनच उत्तम खेळ केला आहे. तिने या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी वगळता बाकी सर्व सामने पहिल्या दोन सेटमध्ये जिंकले आहेत. उपांत्यपूर्व फेरीत तिने पहिला सेट गमावत बाकी दोन सेटमध्ये विजय मिळवला होता. तिने हा सामना १९-२१, २१-१४, २१-१८ असा जिंकला.
She's done it 🥇@Pvsindhu1 adds another Commonwealth Games gold medal to her tally in the women's badminton singles!
Congratulations! 👏#CommonwealthGames | #B2022 pic.twitter.com/luUy9PhQvz
— Commonwealth Sport (@thecgf) August 8, 2022
अंतिम फेरीचा पहिला सेट
पहिल्या सेटमध्ये पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिने आघाडी घेतली होती. मात्र सेट ५-५ असा असताना सिंधूने जबरदस्त पुनरागमन करत सेट ११-८ असा केला. तिचे शॉट्स इतके ताकदवान होते की विरोधी खेळाडू मिशेल ली या कॅनेडियन खेळाडूकडे काहीच उत्तर नव्हते. सिंधूने पहिला सेट २१-१५ असा जिंकला आहे. तर सुवर्ण पदक जिंकण्यापासून ती फक्त एकच सेट दूर आहे.
दुसरा सेट
दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने तिचे वर्चस्व कायम राखत उत्तम खेळ केला. सुवर्ण पदकासाठीच्या या महत्वाच्या सेटमध्ये मिशेलने सिंधूला चांगलीच टक्कर दिली. तरीही सिंधूने हार न मानता एक मॅच पॉइंट जिंकत लागोपाठ ५ पॉइंट्स जिंकले. नंतर ५७ शॉट्सच्या रॅलीमध्ये मिशेलने लागोपाठ ३ पॉइंट्स जिंकत फरक काहीसा कमी केला होता. तर सिंधूने मारलेल्या दोन क्रॉस काउंटरने सुवर्ण पदकाचे अंतर कमी केले.
सिंधूची कॉमनवेल्थ गेम्समधील कामगिरी
सिंधूचे कॉमनवेल्थ गेम्सचे हे एकूण पाचवे तर या २२व्या हंगामातील दुसरे पदक ठरले आहे. या स्पर्धेच्या मिश्र संघामध्ये खेळताना तिने रौप्य पदक जिंकले आहे. तिने २०१८ गोल्ड कोस्ट येथे महिला एकेरीत रौप्य आणि मिश्र फेरीत सुवर्ण पदक जिंकले. तसेच २०१४च्या स्पर्धेत महिला एकेरीत कांस्य जिंकले होते.
कॉमनवेल्थ गेम्सच्या एकेरीत सुवर्ण पदक जिंकणारी सिंंधू केवळ दुसरीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. तिच्याआधी सायना नेहवालने २०१० आणि २०१८ महिला एकेरीचे सुवर्ण पदक जिंकले होते.
भारताची कॉमनवेल्थ गेम्समधील पदकसंख्या
सिंधूने सुवर्ण पदक जिंकताच भारताची या स्पर्धेत एकूण १९ सुवर्णपदके झाली आहेत. याबरोबरच भारत पदकतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकत चौथ्या स्थानावर आला आहे. आतापर्यंत भारताची या स्पर्धेतील एकूण पदकसंख्या ५५ झाली असून त्यात १५ रौप्य आणि २२ कांस्य पदकांचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आम्हाला संघात हे बदल करावे लागतील’, अंतिम सामन्यात पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीतचे मोठे विधान
VIDEO | लिविंगस्टोनने पाडला षटकारांचा पाऊस, ‘द हंड्रेड’मध्ये राशिद खानची धुलाई