---Advertisement---

Breaking: भारताच्या ‘सेन’नं गाठलं ‘लक्ष्य’! अंतिम सामन्यात विजय मिळवत घेतलंय सुवर्णपदक

On: सोमवार, ऑगस्ट 8, 2022 4:39 PM
Lakshya Sen
---Advertisement---

बर्मिंघम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) २०२२ भारतासाठी सोमवारचा (८ ऑगस्ट) दिवस बॅडमिंटनमध्ये उल्लेखनीय ठरला आहे. पहिले महिला एकेरीत पीव्ही सिंधूने सुवर्ण पदक जिंकले, तर पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनने सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याने मलेशियाच्या त्झे योंगला १९-२१, २१-९, २१-१६ असे पराभूत केले आहे.

लक्ष्य सेन (Lakshya Sen) याचे हे कॉमनवेल्थ गेम्स एकेरीतील पहिलेच पदक आहे. तसेच भारताच्या मिश्र संघात त्याचा समावेश होता. या स्पर्धेत भारताच्या मिश्र संघाने रौप्य पदक पटकावले आहे. तसेच भारताच्या किदम्बी श्रीकांतने पुरूष एकेरीचे कांस्य पदक जिंकले आहे. यावरून भारतीय बॅडमिंटनपटूंनी हे कॉमनवेल्थ चांगलेच गाजवले आहे.

 

पहिल्या सेटमध्ये लागोपाठ ४ पॉइंट्स जिंकले, मात्र मलेशियाच्या खेळाडूने सुरूवातीपासूनच सेनचे आक्रमक सुरूच ठेवले. त्याने १ गेम पॉइंट् जिंकला. हा सेट अटीतटीचा झाला असून पहिला सेट लक्ष्यने १९-२१ असा गमावला. त्याने दुसऱ्या सेटमध्ये जबरदस्त पुनरागमन केले आहे. त्याने दुसरा सेट २१-९ असा जिंकला आहे.

सेन आणि योंग या दोघांंनीही एक-एक सेट जिंकला. यामुळे तिसरा सेट चुरशीचा होणार होता आणि तसा तो झालाही. तिसऱ्या या निर्णायक सेटमध्ये योंगने ३-२ अशी काहीशी आघाडी घेतली होती. मात्र सेनने अप्रतिम बॅकहॅण्ड शॉट्स मारले, त्यातच योंगनेही काही चुका केल्या. त्याच्या या चुकांचा फायदा उठवत सेनने १५-९ अशी आघाडी घेतली. त्याने तिसरा सेट २१-१६ असा जिंकत त्याच्या कॉमनवेल्थ गेम्सच्या पदार्पणातच पहिले सुवर्ण पदक पटकावले आहे.

लक्ष्यने सुवर्ण जिंकताच भारताचे हे या २२व्या कॉमनवेल्थ हंगामातील २०वे सुवर्ण पदक ठरले आहे. तसेेच भारताने आतापर्यंत या स्पर्धेत ५७ पदके जिंकली आहेत. त्यात १५ रौप्य आणि २२ कांस्य पदकांचा समावेश आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! बुमराहच्या ‘पाठी’ पुन्हा दुखापतीचा वेताळ! आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

‘हार्दिकला बनायचे आहे भारताचा पूर्णवेळ कर्णधार!’, वाचा पाचवा टी-२० सामना जिंकल्यावर काय म्हणाला

CWG 2022: अचंता शरथची टेबल टेनिसमध्ये भन्नाट कामगिरी! भारताला जिंकून दिले २२वे सुवर्ण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---