आज शुक्रवारी (17 जानेवारी) राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा पार पडला. ज्यात जगातील काही प्रमुख खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन ऑलिंपिक पदक विजेत्या नेमबाज मनू भाकर आणि बुद्धिबळ विश्वविजेत्या डी. गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान केला. या दोन्ही खेळाडूंना टाळ्यांच्या कडकडाटात हा सन्मान प्रदान करण्यात आला, जे त्यांच्या कठोर परिश्रमाचे प्रतिबिंब आहे. मनू भाकरने ऑलिंपिकमध्ये देशाचे नाव उंचावले आहे. तर डी गुकेशने अलिकडेच बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले आहे.
मनू भाकरने 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकली. त्यापैकी एक तिने महिलांच्या एकेरी 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत तर दुसरे पदक मिश्र 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत असे दोन कांस्यपदक जिंकले.
MANU BHAKER, THE SUPERSTAR OF PARIS OLYMPICS…!!!!
– Manu Bhaker has been awarded the Major Dhyan Chand Khel Ratna Award. 🥇 pic.twitter.com/GAPWYoUfRF
— Johns. (@CricCrazyJohns) January 17, 2025
तर डी गुकेशने सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ विजेता होण्याचा किताब जिंकला होता. गुकेशने चिनी ग्रँडमास्टर डिंग लिरेनला पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला होता. गुकेश वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी विश्वविजेता बनला.
Youngest Chess World Champion D Gukesh is honoured with the Khel Ratna Award at the National Sports Awards 2024!! ❤️#KhelRatnapic.twitter.com/VbFKyr8UfD
— Khel Now (@KhelNow) January 17, 2025
हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हाॅकी संघाने पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकला होता. हरमनप्रीत सिंग याशिवाय टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या संघाचाही भाग होता.
President #DroupadiMurmu presents Major Dhyan Chand Khel Ratna Award to Men’s Hockey Team Captain Harmanpreet Singh at the National Sports Awards 2024. #Hockey #NationalSportsAwards @Media_SAI@IndiaSports @13harmanpreet pic.twitter.com/bhA1q5mdvw
— DD News (@DDNewslive) January 17, 2025
दुसरीकडे, उंच उडी मारणारा प्रवीण कुमारबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 2024 च्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. याशिवाय, प्रवीण कुमारने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. प्रवीण कुमारचा डावा पाय जन्मापासूनच लहान होता.
Praveen Kumar receives Major Dhyan Chand Khel Ratna Award at Rashtrapati Bhavan ✨
– Paris Paralympics 🥇and Tokyo Paralympics 🥈pic.twitter.com/g9S38Bmgyz
— The Khel India (@TheKhelIndia) January 17, 2025
या खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला
1. डी गुकेश (बुद्धिबळ)
2. हरमनप्रीत सिंग (हॉकी)
3. प्रवीण कुमार (पॅरा अॅथलेटिक्स)
4. मनु भाकर (शूटिंग)
हेही वाचा-
आयपीएल 2025 पूर्वी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू दुखापती
करुण नायर नाही, या खेळाडूला मिळेल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संधी! कारण जाणून घ्या
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारत ‘अ’ संघ या टीमविरुद्ध सामना खेळणार