---Advertisement---

सेमी फायनल २: दबंग दिल्लीपुढे बंगळुरू बुल्सचे नामोहरम, अंतिम सामन्यात पटणा पायरेट्सचे असेल आव्हान

On: बुधवार, फेब्रुवारी 23, 2022 9:54 PM
Delhi-Bengaluru
---Advertisement---

प्रो कबड्डी २०२१ चा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून या स्पर्धेचे प्लेऑफ सामने सुरू आहेत. २३ फेब्रुवारी रोजी प्रो कबड्डीचे उपांत्य फेरी सामने झाले. यातील दुसरा उपांत्य फेरी सामना २०१९ प्रो कबड्डीचा उपविजेता दबंग दिल्ली विरुद्ध बंगळुरू बुल्स यांच्यात झाला. दबंग दिल्ली संघाने हा सामना ४०-३५ गुणांच्या फरकाने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. अंतिम सामन्यात ते पटणा पायरेट्सशी भिडतील. 

तत्पूर्वी पहिला उपांत्य फेरी सामना ३ वेळच्या विजेत्या पटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात झाला होता. पटणा संघाने ३८-२७ गुणांच्या फरकाने सामना जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, प्रो कबड्डीच्या इतिहासात पटणा संघ सर्वात यशस्वी संघ राहिला आहे. त्यांनी आतापर्यंत ६ वेळा प्रो कबड्डीच्या प्लेऑफ सामन्यांपर्यंत मजल मारली आहे. तर त्यापैकी ३ वेळा विजेतेपद जिंकले आहे. यंदाही त्यांनी अंतिम सामन्यात धडक मारली असल्याने हा संघ विक्रमी चौथे जेतेपद जिंकूनच हंगामाचा शेवट करणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे दबंग दिल्लीने आतापर्यंत एकवेळाही प्रो कबड्डीचे जेतेपद पटकावलेले नाही.

https://twitter.com/ProKabaddi/status/1496504237702131713?s=20&t=jQHMzLp1vjKHLqB_Ks2xqA

प्रो कबड्डीचा अंतिम सामना २५ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता होणार आहे. या सामन्यात पटणा पायरेट्स आणि पैकी कोणता संघ बाजी मारेल? हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

सेमी फायनल १: प्रो कबड्डीला मिळाला पहिला फायनलिस्ट,पटणा पायरेट्स यूपी योद्धांवर ११ गुणांनी विजय

मोहन बागानचे लक्ष्य ‘प्ले ऑफ’ फेरी निश्चितीचे; ओदिशाला देणार आव्हान

अबब! कॅरेबियन गोलंदाजांचा घाम काढणाऱ्या वेंकटेशची टी२० क्रमवारीत २०३ स्थानांनी उडी, सूर्यकुमारलाही फायदा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---