पुणे, 26 जुलै 2023: महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) सीझन 4 मध्ये बुधवारी दबंग दिल्लीच्या साथियन ग्यानसेकरनने ऑलिम्पियन अचंता शरथ कमालचा 3-0 असा धुव्वा उडवला.
भारतीय टेबल टेनिस फेडरेशनच्या (टीटीएफआय) मान्यतेखाली नीरज बजाज आणि विटा दाणी यांनी फ्रँचायझी-आधारित अल्टिमेट टेबलटेनिस लीगला प्रोत्साहन दिले आहे. 2017 पासून सुरू झालेली लीग भारतातील टेबलटेनिससाठी गेम चेंजर ठरली आहे. आशियाई सुवर्णपदक विजेता याला संपूर्ण सामन्यात लौकिकाला साजेसा खेळ करता आली नाही. शरथ आणि साथियन यांच्यातील पहिल्या गेममध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र, दुसर्या आणि तिसर्या गेममध्ये सथियनने 11-3 आणि 11-6 अशा फरकाने बाजी मारली.
महिला एकेरीतील चुरशीच्या लढतीत जागतिक क्रमवारीमध्ये 30व्या स्थानी असलेल्या यांग्झी लियु हिने श्रीजा अकुला हिच्यावर 2-1 असा विजय मिळवला. पहिला गेम 11-8 असा जिंकून लियु हिने प्रतिस्पर्धीवर आघाडी घेतली तरी श्रीजाने खेळ उंचावत दुसरा गेम त्याच फरकाने आपल्या नावे करताना बरोबरी साधली. तिसर्या आणि निर्णायक गेममध्ये यांग्झी हिने 11-8 अशा फरकासह विजयावर शिक्कामोर्तब केले.
दफान्यूज द्वारा समर्थित इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4 चे सर्व सामने स्पोर्ट्स एटीन आणि जिओ सिनेमावर सायंकाळी 7.30 वाजल्यापासून प्रसारित होत आहेत आणि बुकमायशोवर तिकिटे उपलब्ध आहेत. (Dabang Delhi’s Sathian defeats veteran Achanta Sharath Kamal in Ultimate Table Tennis)
महत्वाच्या बातम्या –
विराटमुळे संपलं झहीरचं करिअर! इशांत शर्माने सांगितलं 100 कसोटी खेळता न येण्यामागचं कारण
टीम इंडिया स्वीकारणार कॅरेबियन चॅलेंज! पहिल्या वनडेत अशी असेल प्लेईंग 11