पुणे, 16 डिसेंबर 2023: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पवन सेहरावत व नवीन कुमार यांच्या आक्रमक चढाया आणि आशू मलिकची अप्रतिम कामगिरीच्या जोरावर दबंग दिल्ली संघाने तेलगू टायटन्सचा 51-40 असा पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये सुरू असलेल्या या लढतीत पवन आणि नवीन कुमार यांनी प्रत्येकी 14 गुण, तर आशू मलिकने 16 गुणांची कमाई करताना विजयात मोलाचा वाटा उचलला.
पूर्वार्धात दोन्ही संघातील चढाई पटुंची झुंज पाहायला मिळाली. मात्र नवीन आणि पवन यांनी प्रत्येक चढाईत गुण टिपताना दिल्लीला तेलगू टायटन्स विरुध्द पहिला लोन करण्याची संधी मिळवून दिली. यावेळी दिल्ली कडे 11-3 अशी आघाडी होती.
तेलगू टायटन्सच्या चढाई पतूनी पाच मिनिटात 9 गुण मिळवताना ही पिछाडी भरून काढली. मात्र नवीनने सूपर रेड मध्ये तीन गडी बाद करताना दिल्लीचे वर्चस्व कायम राखले. टायटन्सवर दुसरा लोन चढवताना दिल्लीने मध्यांतराला 8 गुणांची आघाडी घेतली.
उत्तरार्धात टायटन्सने जोरदार झुंज देत पहिल्या दहा मिनिटात पुनरागमनाची चिन्हे दाखवली. आशू मलिकने केलेल्या सुपर टाकल नंतर टायटन्सचा प्रतिकार कोसळला आणि दिल्लीने त्याच्यावर तिसरा लोन चढविला.
मलिक ने त्यानंतर प्रत्येक चढाईत गुण मिळवताना दिल्लीला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्याच्याच चमकदार कामगिरी मुळे दिल्लीने आणखी एक लोन चढवताना टायटन्स वर 11 गुणांच्या फरकाने विजयाची पूर्तता केली. (Dabang Delhi’s second win after defeating Telugu Titans)
रविवार, 17 डिसेंबर 2023 रोजी होणारे सामने
पटना पायरेटस् विरुध्द जयपूर पिंक पँथर्स रात्री 8 वाजता
यू मुंबा विरुध्द तमिळ थलाईवाज रात्री 9 वाजता
महत्वाच्या बातम्या –
राजकोटमध्ये घडला इतिहास! हरियाणा पहिल्यांदाज विजय हजारे ट्रॉफीचा मानकरी, राजस्थानला चारली पराभवाची धूळ
IPL News: रोहित सीएसकेकडे? चेन्नईच्या पोस्टवर रितीकाची ‘ती’ कमेंट, चाहते टेन्शनमध्ये