---Advertisement---

डेल स्टेन म्हणतो, डिविलियर्स प्रमाणेच हा खेळाडूही आहे ‘मिस्टर ३६०’

---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलची तुलना माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्सशी केली आहे. सध्या स्टेन आणि मॅक्सवेल बीग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून एकत्र खेळत आहेत.

cricket.com.au. ने दिलेल्या वृत्तानुसार स्टेन म्हणाला, ‘जेव्हा टी20 चा विचार होतो तेव्हा असे खेळाडू खूप क्वचित मिळतात जे सहजतेने मोठे फटके मारु शकतात. मॅक्सवेलही यामध्ये हुशार आहे.’

‘आपण एबी डिविलियर्सला मिस्टर 360 म्हणतो, पण मॅक्सवेलही तसाच आहे. एबीने तो ज्याप्रकारे खेळतो, त्यामुळे मिस्टर 360 हे टोपननाव कमावले आहे. पण जेव्हा एबी खेळत नाही तेव्हा मॅक्सवेलला मिस्टर 360 आपण म्हणू शकतो. कारण ज्या क्षेत्रात चेंडू जाऊ नये असे वाटते तिथेही चेंडू फटकावण्याची त्याच्याकडे क्षमता आहे.’

याबरोबरच स्टेनने मॅक्सवेलचे कौतुक करताना भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागचेही उदाहरण दिले आहे.

स्टेन म्हणाला, ‘मॅक्सवेलकडे मजबूत मनगट आहे. पॉइंटच्या दिशेने षटकार मारणारे खूप कमी खेळाडू आहेत. सेहवाग असा एक खेळाडू होता, जो असे फटके मारायचा. मॅक्सवेलही हुशार आहे कारण तो पुढचा चेंडू डिप स्क्वेअर लेगला मारेल, ज्यामुळे एक गोलंदाज म्हणून तूम्हाला नेहमीच तो पुढे काय करेल याचा विचार करावा लागतो.’

मॅक्सवेलने काही दिवसांपूर्वी मानसिक ताणामुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. पण त्याने त्यानंतर बीग बॅश लीगमधून क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केले आहे.

त्याने बीग बॅश लीगमध्ये चालू मोसमात आत्तापर्यंत 3 सामन्यात 42.66 च्या सरासरीने 128 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 39 चेंडूत केलेल्या 83 धावांच्या तूफानी खेळीचाही समावेश आहे. तसेच त्याने या 3 सामन्यात मिळून 2 विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---