आयपीएल 2025 चा थरार सुरू झाल्यावर, पहिल्या काही सामन्यांत धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळाल्याने अनेकांनी मोठमोठ्या धावसंख्यांचे अंदाज लावायला सुरुवात केली. अशातच दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने एक मोठं भाकित केलं होतं.
स्टेनने 23 मार्च रोजी सोशल मीडियावर लिहिलं होतं की, 17 एप्रिलला होणाऱ्या हैदराबाद विरुद्ध मुंबई सामन्यात एकूण 300धावा होतील. मात्र सामना सुरु झाल्यावरच हे भाकित चुकीचं ठरल्याचं स्पष्ट झालं.
Small prediction.
— Dale Steyn (@DaleSteyn62) March 23, 2025
April 17 we’ll see the first 300 in IPL.
Who knows, I might even be there to see it happen.
हैदराबादने संथ सुरुवात करत पहिल्या 10 षटकांत केवळ 75 धावा करताच स्टेनने पुन्हा सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली – “दुर्दैवाने आज 300 होत नाहीये.”
No 300 today unfortunately
— Dale Steyn (@DaleSteyn62) April 17, 2025
या प्रतिक्रियेनंतर चाहत्यांनी स्टेनला ट्रोल करत सोशल मीडियावर गंमतीशीर कमेंट्स केल्या.
हैदराबादने पहिल्या सामन्यात राजस्थानविरुद्ध 286 धावांचा डोंगर रचला होता. त्याचाच प्रभाव स्टेनच्या भाकितावर झाला असावा. मात्र त्यानंतर हैदाराबादच्या फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली नाही.
सध्या हैदाराबदने 6 पैकी केवळ 2 सामने जिंकले असून, ते पॉइंट्स टेबलमध्ये 9व्या स्थानावर आहेत. सातत्याच्या पराभवामुळे प्लेऑफच्या शर्यतीतूनही संघ बाहेर पडल्याचं चित्र आहे. अश्या परिस्थितीत डेल स्टेनचं भाकित तर फसलंच, पण हैदराबादचं यंदाचं स्वप्नसुद्धा अधांतरी झाल्याचं दिसतंय.