मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 4 गडी राखून पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 162 धावा केल्या, प्रत्युत्तरात मुंबईने हे लक्ष्य 19व्या षटकात 4 विकेट्स शिल्लक असताना पूर्ण केले. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा होता. मधल्या षटकांमध्ये सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स यांच्यातील 52 धावांच्या भागीदारीने मुंबईच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या सामन्यात मुंबई इंडियन्सना 163 धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी खूप जलद सुरुवात केली. रोहित शर्माने पहिल्या 4 षटकांमध्ये बहुतेक चेंडू खेळले, 16 चेंडूत 26 धावा काढून बाद झाला. त्याचा साथीदार रायन रिकेलटन 31 धावा करून बाद झाला.
नंतर, विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव यांनी जबाबदारी स्वीकारली आणि 52 धावांची भागीदारी करून एमआयचा विजय सोपा केला. विल जॅक्सने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. त्याने गोलंदाजी करताना 2 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीतही सिंहाचा वाटा दिला. त्याने 26 चेंडूत 36 सर्वाधिक धावा केल्या.
#WillJacks looking positive at the crease.
— Star Sports (@StarSportsIndia) April 17, 2025
Doesn’t hold back goes for a big one and connects well!
Watch the LIVE action ➡ https://t.co/vjFT7Kl29M#IPLonJioStar ???? #MIvSRH | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar pic.twitter.com/VQ3l5miTtF
शेवटी हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्या फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सने 11 चेंडू व 4 गडी राखू सामना जिंकला. हंगामातील मुंबईचा हा तिसरा विजय आहे.






