---Advertisement---

कोण होणार आयपीएल २०२१ चा विजेता? स्टेनने केली भविष्यवाणी

On: गुरूवार, ऑक्टोबर 14, 2021 10:30 PM
---Advertisement---

बुधवारी आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसरा क्वालिफायरचा सामना पार पडला.या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला ३ गडी राखून पराभूत केले. यासह त्यांनी आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात आमने-सामने येणार आहेत. अशातच डेल स्टेनने या सामन्यात कोणता संघ विजयी होईल याबाबत भविष्यवाणी केली आहे.

स्टेनने केली भविष्यवाणी

ईएसपीएन क्रिकइन्फोवर बोलताना डेल स्टेनने म्हटले की, “मी नेहमीच आकडेवारीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. हा सामना कसिनो सारखा होणार आहे. जर सलग १० वेळा काळा रंग आला तर कधी ना कधी लाल रंग येईलच. मला असे वाटते की, कोलकाता नाईट रायडर्स संघाचा एखादा वाईट दिवस लवकरच येईल. त्यांचे चुकीचे निर्णय, ओएन मॉर्गन आणि दिनेश कार्तिक यांच्या खराब कामगिरीचा त्यांना त्रास सहन करावा लागू शकतो. क्वालिफायर सामन्यात असे झालेच होते. अंतिम सामन्यात असे होऊ नये.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “माझ्या मते, चेन्नई सुपर किंग्स संघ सर्वोत्कृष्ट संघ आहे. त्यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतले आहेत. धोनीने दिल्ली विरुद्ध अप्रतिम फलंदाजी केली होती. तसेच चांगले नेतृत्व देखील केले होते. त्यांचे फलंदाज देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे केकेआर हा सामना गमावणार.”

दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात केकेआरचा जोरदार विजय 

दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली होती. तर श्रेयस अय्यरने नाबाद ३० धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटकाअखेर ५ बाद १३५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली होती. तर शुबमन गिलने ४६ धावांचे योगदान दिले. शेवटच्या २ चेंडूवर ६ धावांची आवश्यकता असताना , राहुल त्रिपाठीने षटकार मारून या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---