---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या मदतीला येणार हा दिग्गज गोलंदाज

On: शुक्रवार, एप्रिल 12, 2019 5:47 PM
---Advertisement---

आयपीएल 2019 मध्ये सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंललोरचा संघ विजयासाठी संघर्ष करत आहे. त्यांना आत्तापर्यंत झालेल्या सर्व 6 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. असे असतानाच त्यांच्या संघात डेल स्टेन हा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सामील होणार आहे, त्यामुळे त्यांना गोलंदाजी भक्कम होण्याची अपेक्षा असेल.

बेंगलोरने स्टेनला दुखापतग्रस्त नॅथन कुल्टर नाईल ऐवजी कराकबद्ध केले आहे. त्यामुळे आता स्टेन नाईलचा बदली खेळाडू म्हणून संघात सामील होईल.

स्टेन हा आयपीएलमध्ये दोन वर्षांनी पुनरागमन करणार आहे. तो आयपीएलमध्ये शेवटचे 2016 मध्ये गुजरात लायन्सकडून खेळला आहे. त्याचबरोबर स्टेन याआधीही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून 2008 ते 2010 या सुरुवातीच्या तीन मोसमात खेळला आहे. त्याने बेंगलोरकडून खेळताना 28 सामन्यात 27 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 90 सामने खेळले असून 92 विकेट्स घेतल्या आहेत.

स्टेनने तो बेंगलोर संघात सामील होण्याबाबत थोडी कल्पना दिली होती. त्याने त्याच्या इन्टाग्राम स्टोरीला त्याच्या भारतीय व्हिसाचा फोटो शेअर केला होता. पण तो कशासाठी येत आहे हे कारण त्याने स्पष्ट केले नव्हते. असे असले तरी त्याने व्हिसाच्या फोटोवरील खोडलेल्या कारणाच्या आधी ‘टू प्ले'(खेळण्यासाठी) हे स्पष्ट दिसत होते. त्याने या स्टोरीला कॅप्शन देताना ‘एक छोटेसे सरप्राइज’ असे लिहिले होते.

Screengrab: Instagram/dalesteyn

तसेच बेंगलोर संघानेही ट्विट केले आहे की ‘संघात पुन्हा स्वागत आहे.’ मात्र यात त्यानी कोण खेळाडू आहे ते मात्र खोडले आहे.

बेंगलोर संघाचा आयपीएल 2019 मधील सातवा सामना शनिवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध होणार आहे. या सामन्यात स्टेन खेळणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच या सामन्यातून आयपीएल 2019 मधील पहिला विजय मिळवण्यास बेंगलोर संघ उत्सुक असेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

रविंद्र जडेजा, एमएस धोनीने केली ही खास सेंच्यूरी पूर्ण…

नो बॉल प्रकरणी धोनी का गेला अंपायरकडे, सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला खूलासा

भर मैदानात अंपयारशी वाद एमएस धोनीला पडला महागात…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment