---Advertisement---

‘धोनी सीएसकेचा बॉस’, आयपीएल २०२१ ‘कॅप्टनकुल’चा अखेरचा हंगाम असल्याच्या चर्चेवर स्टेनचे भाष्य

On: मंगळवार, ऑक्टोबर 5, 2021 1:19 AM
---Advertisement---

महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे आणि आता तो फक्त इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसतो आहे. अनेक क्रिकेट पंडितांनी भाकीत केले आहे की, कर्णधार आणि खेळाडू म्हणून चेन्नई सुपर किंग्ससोबत धोनीचा हा शेवटचा हंगाम असू शकतो. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू डेल स्टेननेही धोनीच्या भविष्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

स्टेनचा म्हणाला की सीएसकेच्या संघाने २०२१ मध्ये केलेले पुनरागमन धोनीच्या कर्णधारपदाचा परिणाम आहे. २०२० चा एकमेव आयपीएल हंगाम होता, ज्यात सीएसके संघ प्लेऑफमध्ये पोहोचला नव्हता.

स्टेन धोनीबद्दल म्हणाला, ‘सीएसकेचा बॉस धोनी आहे. जेव्हा तुम्ही चेन्नईचा विचार करता, तेव्हा तुम्ही एमएस धोनीचा विचार करता आणि सर्वांनाच माहिती आहे का? त्याच्याकडे काही सामने शिल्लक आहेत, त्याने स्पर्धेत आधीच खूप चांगली प्रगती केली आहे. पण आपण धोनीला मैदानावर काही विशेष करताना पाहिले नाही. जर धोनीने अंतिम फेरीत सीएसकेसाठी विजयी धावा केल्या, तर तो पुढील वर्षी सीएसकेकडून खेळताना दिसू शकतो.’

धोनीने या हंगामात सीएसकेकडून १२ सामन्यात फक्त ६६ धावा केल्या आहेत. ४० वर्षीय धोनी या वर्षी प्लेऑफमध्ये सीएसकेचे नेतृत्व करेल आणि संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेल.

धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१९ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात धोनी धावबाद झाला आणि भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मग धोनी क्रिकेटपासून ब्रेकवर गेला होता. यानंतर, कोरोनाचा उद्रेक क्रिकेट जगतावरही दिसून आला. नंतर १५ ऑगस्ट २०२० रोजी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

गेल्या वर्षी सीएसकेच्या खराब कामगिरीनंतर असे मानले जात होते की, तो २०२१ मध्ये तो आयपीएलमधूनही निवृत्त होईल, पण २०२० च्या शेवटच्या साखळी सामन्यानंतर धोनी म्हणाला होता की, तो आयपीएल २०२१ हंगामात खेळेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘विकेट घेण्यापेक्षा तू हे कर’, विराटने चहल दिला होता ‘हा’ गुरुमंत्र

‘बायो बबलमध्ये वेळ घालवत नाही, तोपर्यंत दुसऱ्यांना व्याख्यान देऊ नका’, माजी इंग्लिश कर्णधाराने पेनला फटकारले

‘मला कधीच जाणवले नाही, की केएल राहुल एक चांगला लीडर आहे’, जडेजाने केले मोठे व्यक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---