ऑस्ट्रेलियातील जगप्रसिद्ध टी२० लीग म्हणजेच बिग बॅश लीगच्या सिडनी सिक्सर्स आणि ऍडलेड स्ट्रायकर्स संघात रविवारी (२० डिसेंबर) अकरावा सामना झाला. या सामन्यात सिडनी सिक्सर्सने ३८ धावांनी विजय मिळवली. यात अष्टपैलू खेळाडू डॅन क्रिश्चियन याच्या तूफानी अर्धशतकी खेळीचे मोठे योगदान राहिले. त्याने अवघ्या १५ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले. यासह मोठ्या ऐतिहासिक विक्रमाची त्याच्या नावे नोंद झाली आहे.
क्रिश्चियनने फक्त ९ चेंडूत केल्या ४६ धावा
झाले असे की, या सामन्यात ऍडलेड स्ट्राईकर्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सिडनी सिक्सर्सचे फलंदाज सुरुवातीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. सामन्यातील १५व्या षटकातपर्यंत त्यांची धावसंख्या ४ बाद ११६ धावा इतकी होती. त्यानंतर क्रिश्चियन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने ३१२.५०च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत केवळ १५ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. यात ५ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. म्हणजे फक्त ९ चेंडूमध्ये त्याने ४६ धावा कुटल्या.
क्रिश्चियनचे हे अर्धशतक बिग बॅश लीगच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद अर्धशतक होते. यासह क्रिश्चियन बिग बॅश लीगच्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहभागी झाला आहे.
🤯 @danchristian54 UNLEASHED to bring up the 2⃣nd fastest 5⃣0⃣ in @BBL history last night! 💪#smashemsixers #BBL10 pic.twitter.com/CZsmsMqJEl
— Sydney Sixers (@SixersBBL) December 20, 2020
गोलंदाजीतही चमकला क्रिश्चियन
क्रिश्चियनच्या तूफानी अर्धशतकी खेळीमुळे सिडनी सिकर्सने ऍडलेड स्ट्राईकर्सपुढे १७८ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऍडलेड स्ट्राईकर्स संघ २० षटकात १३९ धावाच करू शकला. अशाप्रकारे सिडनी सिकर्सने ३८ धावांनी तो सामना खिशात घातला.
फलंदाजीत चमकलेल्या क्रिश्चियनने गोलंदाजीमध्येही प्रशंसनीय कामगिरी केली. त्याने ४ षटकात २५ धावा देत ऍडलेड स्ट्राईकर्सच्या सलामीविराची विकेट काढली. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
जडेजाचा हलगर्जीपणा बेतला असता रोहित आणि रहाणेच्या जीवावर; ‘हिटमॅन’चा धक्कादायक खुलासा
धक्कादायक! धोनीच्या नेतृत्वात सीएसकेकडून खेळलेल्या खेळाडूची ३२ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती
दुसऱ्या टी20 विजयानंतर केन विलियम्सन म्हणाला, “पाकिस्तान संघ किती मजबूत, हे माहिती आहे”