ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा अनुभवी डॅन ख्रिस्टियन याने गुरुवारी (2 फेब्रुवारी) आपल्या व्यावसायिक क्रिकेट कारकीर्दीतील अखेरचा सामना खेळला. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातून त्याचा सिडनी सिक्सर्स संघ बाहेर पडल्याने त्याला आपल्या कारकिर्दीची अखेर विजेतेपदाने करता आली नाही. 39 वर्षीय ख्रिस्टियनने आपल्या कारकिर्दीत 9 टी20 स्पर्धांचे विजेतेपद जिंकले आहे.
काही दिवसांपूर्वीच ख्रिस्टियन याने आपण या हंगामानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली होती. त्याचवेळी सिडनी सिक्सर्स संघाने प्ले ऑफमध्ये प्रवेश केल्याने तो पुन्हा एकदा विजेतेपदाने आपल्या कारकिर्दीचा शेवट करणार का? हा प्रश्न रंजक होता. मात्र, या चॅलेंजर सामन्यात ब्रिस्बेन हीटने एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह ख्रिस्टियन याच्या कारकिर्दीची समाप्ती झाली.
A rousing round of applause for the retiring Dan Christian as he departs the SCG #BBL12 #BBLFinals pic.twitter.com/iriJUwHO4g
— KFC Big Bash League (@BBL) February 2, 2023
त्याने आपल्या टी20 कारकिर्दीत एकूण 409 सामने खेळले. यामध्ये त्याने 5825 धावा केल्या. यात 2 शतके व 17 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच 280 बळी देखील त्याने मिळवले आहेत. विशेष म्हणजे त्याच्या नावे तब्बल 9 टी20 विजेतेपदे जमा आहेत. परंतु, चार आयपीएल संघासाठी खेळून त्याला एकदाही विजेतेपद जिंकता आले नाही. तो अखेरच्या वेळी आयपीएलमध्ये 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी खेळताना दिसलेला.
या सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला,
“मी थांबत आहे याचे दुःखही आहे व आनंदही आहे. कारण, मी आता कुटुंबाला व मित्रांना अधिक वेळ देऊ शकेल. मागील 20 वर्षांपासून या सर्वांपासून काहीसा लांब राहिलो आहे.”
त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा विचार केल्यास त्याने 23 टी20 व 20 वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केलेले.
(Dan Christian Play His Last Match In BBL End Exciting Career)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता डोळ्यांना ताण देण्याची गरज नाही! बीसीसीआयने जिओला दिली मंजुरी, 4K व्हिडिओत दिसणार आयपीएल सामने
‘या यशाचे श्रेय वडिलांचे’, अहमदाबादमधील शतकानंतर शुबमनची कृतज्ञ कबुली