चाहत्यांचे मनोरंजन कसे करायचे, हे भारतीय खेळाडूंना चांगल्याप्रकारे माहिती आहे. या भारतीय खेळाडूंमध्ये शुबमन गिल याच्या नावाचाही समावेश होतो. गिल सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रिय असतो. तिथे तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. चाहते त्याच्या पोस्टवर लाखो लाईक्सचा वर्षाव करतात. अशातच गिलने गुरुवारी (दि. 2 फेब्रुवारी) त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो त्याचे संघसहकारी ईशान किशन आणि युझवेंद्र चहल यांच्यासोबत दिसत आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
खरं तर, शुबमन गिल (Shubman Gill) याने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत गिलसह ईशान किशन (Ishan Kishan) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांनी एमटीव्हीवरील प्रसिद्धी रिऍलिटी शो ‘रोडीज’चा एक सीन रीक्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता गिलच्या या व्हिडिओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.
या व्हिडिओत तिन्ही खेळाडू भारतीय संघाच्या ग्राऊंडच्या बाहेर वापरली जाणारी जर्सी परिधान केल्याचे दिसत आहेत. शुबमनने यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे, जो ऑडिशन देण्यासाठी आला आहे. किशन हा परीक्षक निखिल चिनप्पा याच्या भूमिकेत आहे, तर चहल दुसरा परीक्षक रघू राम याच्या भूमिकेत आहे. ते गिलला म्हणतात की, “आता तू मला निराश केले आहे.”
यानंतर ईशान त्याच्या खुर्चीवर उभा राहतो आणि गिलला त्याची तीव्रता आणि धाडस दाखवण्यास सांगतो. यावर प्रतिक्रिया देत गिल लगेच म्हणतो की, “माझ्यामध्ये ती तीव्रता आहे. माझ्याकडे धाडसही आहे. मी हे करेल. मी हे नक्की करेल.” यानंतर, ईशान चिनप्पाची नक्कल करत गोरिल्लाचा आवाज काढत गिलच्या डोक्यावरून उडी मारत बेडवर जातो. तो पुढे गिलला स्वत:ला चापट मारण्यास सांगतो. तोदेखील असेच करतो. त्यानंतर ईशानही गिलला चापट मारताना दिसत आहे. त्यानंतर ईशान गिलला बसायला सांगतो. खरं तर, हा सीन रोडीजच्या एका ऑडिशन राऊंडवरून बनवण्यात आला आहे.
तिसऱ्या टी20 सामन्यात गिलचे वादळी शतक
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबाद येथे खेळण्यात आला. या सामन्यात शुबमन गिल याने 63 चेंडूत नाबाद 126 धावा कुटल्या आणि शतक साजरे केले. त्याच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 विकेट्स गमावत 234 धावांचा डोंगर उभारला होता. हे आव्हान पार करताना न्यूझीलंड संघाचा डाव 12.1 षटकात 66 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना 168 धावांनी खिशात घातला. (opener shubman gill had fun with ishan kishan yuzvendra chahal t20i century in ind vs nz 3rd odi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ख्रिस्टियनच्या दैदिप्यमान कारकिर्दीची अखेर! 9 टी20 विजेतेपदांसह संपविला प्रवास
असे 7 क्रिकेटपटू ज्यांचे षटकार चिरकाल राहतील आठवणीत! नेमके कोण आहेत हे खेळाडू