आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सोमवारी (२५ ऑक्टोबर) पैसावसूल सामना पाहायला मिळाला. या सामन्यात अफगानिस्तान आणि स्कॉटलॅंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. शारजाहाच्या मैदामावर पार पडलेल्या या सामन्यात अफगानिस्तान संघातील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी आणि अप्रतिम गोलंदाजी करत स्कॉटलॅंड संघावर १३० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अफगानिस्तान संघातील फलंदाज रहमनुल्लाह गुरबाजने एक अविश्वसनीय शॉट खेळला, जे पाहून इंग्लंडच्या महिला यष्टिरक्षक फलंदाजानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या सामन्यात रहमनुल्लाह गुरबाजने ३७ चेंडूत ४६ धावांची खेळी केली.या खेळी दरम्यान त्याने १ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार मारले होते. यापैकी एक षटकार पाहून तर सर्वांना आश्चर्य झाले होते.
तर झाले असे की, स्कॉटलॅंड संघाचा वेगवान गोलंदाज जोश डेवीने यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न फसला आणि रहमनुल्लाह गुरबाजने स्क्वेअर लेगच्या दिशेने गगनचुंबी षटकार मारला. या शॉटची खासियत म्हणजे हा शॉट पाहून चाहत्यांना एमएस धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची आठवण आली.
या अप्रतिम हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर कॅप्शन देत त्यांनी ‘अनरियल’ असे लिहिले आहे. तसेच या व्हिडिओवर इंग्लंड महिला संघाची यष्टिरक्षक फलंदाज डॅनियल वॅटने आपल्या प्रतिक्रीया दिली आहे. तिने प्रतिक्रीया देत हेलिकॉप्टरचा ईमोजी शेअर केला आहे. तिचे असे म्हणणे आहे की, हा एक अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट आहे.
https://www.instagram.com/reel/CVdMieNlDT1/?utm_medium=copy_link
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात अफगानिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगानिस्तान संघाकडून नजीबुल्लाह झद्रानने सर्वाधिक ५९ धावांची खेळी केली. तर रहमनुल्लाह गुरबाजने या डावात ४६ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर अफगानिस्तान संघाला २० षटक अखेर ४ बाद १९० धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या स्कॉटलॅंड संघाकडून जॉर्ज मुन्सीने सर्वाधिक २५ धावा केल्या तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अफगानिस्तान संघाकडून मुजीब उर रहमानने ५ तर राशिद खानने ४ गडी बाद करत हा सामना १३० धावांनी अफगानिस्तान संघाला जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
लाईव्ह सामन्यात ‘या’ २ खेळाडूंची शाब्दिक बाचाबाची बदलली धक्काबुक्कीत, आयसीसीकडून कठोर कारवाई