पाच वेळचा इंडियन प्रीमिअर लीगचा किताब पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या हंगामातील १४व्या सामन्यात बुधवारी (०७ एप्रिल) दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना कोलकाता नाईट रायडर्स संघाने ५ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्स चाहत्यांसाठी व्हिलन ठरला. त्याने १६व्या षटकात सर्वाधिक धावा दिल्या. त्यामुळे कोलकाता संघाने सहजरीत्या सामना खिशात घातला. यानंतर चाहत्यांनी त्याला जोरदार ट्रोल केले आहे. विशेष म्हणजे, त्याला सोशल मीडियावर अपशब्दही वापरले आहेत. याची माहिती सॅम्सने पोस्ट शेअर करत दिली आहे. तसेच, खंतही व्यक्त केली आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकत कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना मुंबईने निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत १६१ धावा केल्या होत्या. मुंबईच्या १६२ धावांचे आव्हान कोलकाताने १६व्या षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केले. विशेष म्हणजे, १६वे षटक टाकण्यास आलेल्या मुंबईच्या डॅनियल सॅम्सला (Daniel Sams) फलंदाजी करत असलेल्या कोलकाताच्या पॅट कमिन्सने चांगलाच चोप दिला. सॅम्सने ३५ धावा दिल्या. यातील ३२ धावा कमिन्सने चोपल्या, तर ३ धावा अधिकच्या होत्या. सॅम्सचे हे षटक आयपीएल इतिहासातील तिसरे सर्वात महागडे षटक ठरले.
नेटकऱ्यांनी साधला निशाणा
कोलकाताविरुद्धच्या सामन्यात झालेल्या पराभवासह मुंबई संघ या हंगामात सलग तिसऱ्यांदा पराभूत झाला. यानंतर काही युजर्सनी सॅम्सवर निशाणा साधत त्याच्या एका पोस्टवर अपशब्द वापरले.
https://www.instagram.com/p/Cbe3bk_M_Qz/?utm_source=ig_web_copy_link
काय म्हणाला सॅम्स-
“आदराने, जिंकणे किंवा हरणे हा खेळाचा भाग आहे, मी कबूल करतो की, काल रात्री माझी कामगिरी चांगली नव्हती, पराभवासाठी मी जबाबदार आहे, पण माझ्या वैयक्तिक आयुष्यावरील टीका चांगली नाही. अनेक भारतीय लोक मला ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शिवीगाळ करणारे संदेश पाठवत आहेत. कृपया हे थांबवा,”
https://twitter.com/DanSams95/status/1511962790981951488
सॅम्सने या सामन्यात गोलंदाजी करताना ३ षटकांत ५० धावा देत १ विकेट मिळवली. दुसरीकडे कमिन्सच्या नावावर आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या विक्रमाची बरोबरी झाली. त्याने अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक ठोकले.
https://www.instagram.com/p/Cbe3bk_M_Qz/?utm_source=ig_embed&ig_rid=b4880f26-74f3-46a5-850d-c0ffa6b2e4ac
“गेल्या काही षटकांमध्ये ज्याप्रकारे घडले ते पचवणे कठीण जाईल. आम्हाला खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत,” असे सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला होता.
याव्यतिरिक्त वेगवान अर्धशतक ठोकणारा कमिन्स म्हणाला की, “मला असे वाटते की, मी त्या खेळीने सर्वात आश्चर्यचकित झालो आहे. मला आनंद झाला की, ते बंद झाले. त्याबद्दल अतिविचार करण्याचा प्रयत्न केला नाही. या मोसमात माझ्या पहिल्या गेममध्ये हे करणे खूप समाधानकारक आहे. फक्त लहान सीमारेषेच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न करत होतो.”
एकेवेळी व्हिडीओ गेमच्या नादी लागलेला अकोल्याचा वाघ ‘दर्शन नळकांडे’ आयपीएल गाजवण्यास सज्ज
IPL2022| बेंगलोर वि. मुंबई सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!