आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ स्पर्धा संपायला आली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (०३ एप्रिल) ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ख्राइस्टचर्चच्या मैदानावर होणार आहे. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिज तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. इंग्लंडने डॅनियल वॅटच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर १३७ धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात जागा बनवली आहे.
इंग्लंडची ही सलामीवीर फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (ENGW vs SAW) दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यात (Semi Final) तब्बल ५ वेळा पराभूत होता-होता वाचली. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणातील खराब कामगिरीमुळे वॅटने शतक ठोकले (Danielle Wyatt) आणि इंग्लंडला अंतिम सामन्यात पोहोचवले.
डॅनियल वॅटला ५ वेळा जीवनदान
वॅटने या सामन्यात १२९ धावांची शानदार खेळी (Danielle Wyatt Century)केली. तिने १२९ चेंडू खेळताना १२ चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. ती ४५ व्या षटकात मसाबाटा क्लासने तिला लिजेल लीच्या हातून झेलबाद केले. या खेळीदरम्यान तिला ५ वेळा (Danielle Wyatt 5 Lives) जीवनदान मिळाले.
सर्वप्रथम १०व्या षटकात लिजेल लीने स्लिपमध्ये वॅटचा झेल सोडला. तिने मसाबाट क्लासच्या चेंडूवर हा झेल सोडला होता. त्यानंतर १२व्या षटकातील चौथ्या आणि २७ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरही दक्षिण आफ्रिकी क्षेत्ररक्षकांनी तिचा झेल सोडला. त्यानंतर ३१ व्या षटकातील पाचव्या चेंडूवरही तिला जीवनदान मिळाले. पुढे ३७व्या षटकात वॅटने विश्वचषकातील पहिले आणि वनडे क्रिकेटमधील दुसरे शतक पूर्ण केल्यानंतरही तिला जीवनदान मिळाले. ४१व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पुन्हा तिचा झेल सुटला होता.
A special World Cup innings.#CWC22 | @Danni_Wyatt pic.twitter.com/5rQYTDqYvb
— England Cricket (@englandcricket) March 31, 2022
इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार
दरम्यान वॅटव्यतिरिक्त इंग्लंडकडून सोफी डंकले हिनेही संघाच्या विजयात हातभार लावला. तिने ७२ चेंडूंमध्ये ४ चौकारांच्या मदतीने ६० धावा केल्या. या डावात बांगलादेशकडून शबनीम इस्माइलने ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या २९४ धावांच्या आव्हानाचा बचाव करताना इंग्लंडची फिरकीपटू सोफी इक्लेस्टोन हिने ६ विकेट्स घेतल्या. ८ षटके गोलंदाजी करताना ३६ धावा देत तिने या विकेट्स घेतल्या. तिच्या शानदार गोलंदाजी प्रदर्शनामुळे दक्षिण आफ्रिकेची एकही फलंदाज साधे अर्धशतकही करू शकली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून मिग्नॉन डू प्रिज हिने सर्वाधिक ३० धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मांचे प्रशिक्षकपद धोक्यात! कारणही तितकेच गंभीर
आता सुरू होईल खरी दंगल…! इंग्लंडचा ‘हा’ धडाकेबाज फलंदाज पंजाब किंग्जच्या ताफ्यात सामील
व्याजासकट परतफेड! आरसीबीच्या ‘या’ पठ्ठ्याने घेतला सूड, गोलंदाज असूनही रसेलला ठोकले २ षटकार