इंग्लंड महिला संघातील स्टार खेळाडू डॅनियल वॅट नेहमीच तिच्या ट्विटमुळे चर्चेत असते. कालही ती एमएस धोनीच्या नवीन हेयरस्टाईलबद्दल केलेल्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे.
चेन्न्ई सुपर किंग्जचा कर्णधार असणाऱ्या धोनीने परवा नाबाद अर्धशतक करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध चेन्नईला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात धोनीच्या नवीन हेयरस्टाईलची बरीच चर्चा झाली.
धोनी आयपीएलमध्ये 20 एप्रिलला झालेल्या राजस्थान विरूद्धच्या सामन्यापासुनच नवीन हेयरस्टाईलमध्ये दिसला आहे.
या नवीन हेयरस्टाईलबद्दलच डॅनियल वॅटने ट्विट केला आहे. तिने ट्विटमध्ये लिहीले आहे की “धोेनी हेयरकट छान आहे.”
Dhoni’s hair cut thoughhhh 👌🏽
— Danielle Wyatt (@Danni_Wyatt) April 25, 2018
डॅनियल वॅट ही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची खूप मोठी चहाती आहे. तसेच विराट बेंगलोर संघाचेही नेतृत्त्व करत आहे. त्यामुळे ती यावर्षी आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या बेंगलोर संघाला पाठींबा देत आहे. याबद्दलही तिने ट्विट केले होते.
RCB RCB RCB 😂🙋🏼♀️
— Danielle Wyatt (@Danni_Wyatt) April 7, 2018
इंग्लंड महिला संघाने नुकताच भारताचा दौरा केला होता. या दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडच्या संघात डॅनियल वॅटचाही समावेश होता.
या दौऱ्यात 6 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान झालेल्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवला आहे.
यदाकदाचित आपल्याला माहित नसेल तर…
डॅनियल वॅट ही इंग्लिश क्रिकेटर असून या 26 वर्षीय खेळाडूने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण 2010 साली भारताविरुद्ध मुंबई शहरात केले आहे. या अष्टपैलू खेळाडूने इंग्लंड कडून 56 वनडे आणि 78 टी20 सामने खेळले आहेत.
अतिशय प्रतिभावान क्रिकेटपटू असलेल्या डॅनियलने 4 एप्रिल 2014 रोजी विराटला लग्नाची मागणी घातली होती. हे दोनही खेळाडू चांगले मित्र आहेत. 2014 मध्ये जेव्हा भारताने इंग्लंडचा दौरा केला तेव्हा डॅनियल वॅट आणि विराट कोहली भेटले होते. तेव्हा विराटने तिला स्वतःची बॅट गिफ्ट केली होती.
Kholi marry me!!!
— Danielle Wyatt (@Danni_Wyatt) April 4, 2014
महत्त्वाच्या बातम्या –
–भारत पाकिस्तान सामन्यासाठी असे आहेत तिकीटांचे दर
–पहा व्हिडीओ- सिक्सर किंग जेव्हा आजमावतो स्टंपमागे नशीब
–आयपीएल होणारच, पण भारतात नाही तर या देशात!
–आयपीएलमध्ये पहिल्यांदाच जुळून आला असा योगायोग
–भारतीय संघातील या दोन मित्रांचं मराठीतील संभाषण नक्की पहा
–कसोटी क्रिकेट चाहत्यांसाठी हे आहे नाराज करणारे वृत्त
– सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने
–टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच
–आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली