बर्मिंगहॅम| इंग्लंडविरुद्ध पुनर्निर्धारित पाचव्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा स्पिनर रविचंद्रन अश्विन खेळला नाही. मात्र या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने या निर्णयावर गंभीर आक्षेप घेतले आहेत.
या सामन्यातील इंग्लंडच्या दुसऱ्या व अखेरच्या डावात भारतीय संघ विकेट मिळवण्याचे अयशस्वी प्रयत्न करताना दिसला.
जो रूट (१४२*) आणि जॉनी बेयरस्टो (११४*) दोघांच्या शतकांनी इंग्लंडला शेवटच्या दिवसाआधी बलशाली स्थानावर पोहोचवले. याबाबत कनेरिया म्हणाला, की टीम इंडिया आता इंग्लंडविरुद्ध पुनर्निर्धारित पाचव्या टेस्टसाठी वाईट निवडीची किंमत चुकवते आहे.
देशाचा पहिला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग मंच ‘कू’वर पूर्व पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरिया म्हणाला, “एजबेस्टनमध्ये टीम इंडिया विजय मिळवता मिळवता पराजयाच्या अवस्थेत आली. रविचंद्रन अश्विन प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. हा निर्णय कुणी घेतला? प्रशिक्षकाच्या रूपात द्रविडने इंग्लंडमध्ये नेहमीच खेळ केला आहे. त्याला येथील परिस्थिती चांगलीच माहीत आहे, की इंग्लंडच्या उष्णतेत धावपट्टी कोरडी असते. तिसऱ्या दिवशीपासून चेंडू स्पिन करू लागतो. जिथे शिवण उसवलेली आहे तिथे तर चेंडू स्पिन करणारच. केवळ बुमराहला पाहून वाटते, की तो चमत्कार करू शकतो. भारताने चूक केली आणि त्याची किंमतही त्यांना मोजवी लागली.”
सध्या फॉर्ममध्ये असलेल्या रूट आणि बेयरस्टो या जोडीविरुद्ध भारतीय वेगवान गोलंदाजीचे आक्रमण बरेच प्रभावहीन दिसले आहे. कारण दोघांनी सोमवारी चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात धावा काढण्याची मालिका खंडित होऊ दिली नाही. हीच मालिका पुढेही चालू ठेवत त्यांनी पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडने ७ विकेट्सने हा सामना जिंकला आणि कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत सोडली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पंत-जडेजाच्या शतकी खेळी व्यर्थ, इंग्लंडने ७ विकेट्सने जिंकली पाचवी कसोटी; मालिकाही बरोबरीत
रुट-बेयरस्टोची शतकी खेळी आली भारताच्या विजयाआड
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डची मोठी डील! पुढील पाच वर्षांमध्ये खेळाडूंना मिळणार ‘इतके’ कोटी