युवा भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएल 2020 मध्ये जबरदस्त कामगिरी केली केली होती. या हंगामादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्यात खुन्नसही पाहायला मिळाली. त्यानंतर सूर्यकुमारने विराटवर टीका करणाऱ्या एका ट्विटला लाईक केल्यामुळे चाहत्यांनी त्याच्यावर निशाणा साधला होता. यानंतर आता पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाने सूर्यकुमारबद्दल एक खुलासा केला आहे.
पाकिस्तानच्या खेळाडूचे उदाहरण देत दानिश कनेरियाने केला खुलासा
पाकिस्तान क्रिकेट संघाचा युवा खेळाडू समी अस्लम याने पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. तो आता अमेरिकेकडून क्रिकेट खेळणार आहे. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने देश सोडून गेलेल्या पाकिस्तानच्या खेळाडूचे उदाहरण देत सूर्यकुमार यादवबद्दल महत्वाचे विधान केले.
दानिश कनेरिया म्हणाला, “समी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मात्र, असे असूनही त्याच्यावर अन्याय झाला आहे. शान मसूद आणि इमाम उल हक या खेळाडूंना बऱ्याच संधी मिळाल्या. दुर्दैवाने, पीसीबीने दिलेल्या वागणुकीमुळे पाकिस्तानी खेळाडूंना देश सोडून जावे लागते.”
Sami Aslam left Pakistan will play for USA,during my playing days I was offered by 2 countries but I still went on playing for Pakistan and now this I deserve,should have taken the opportunity watch full video https://t.co/bHi4niugeD
— Danish Kaneria (@DanishKaneria61) December 5, 2020
न्यूझीलंडकडून सूर्यकुमारला मिळाली ऑफर
“सूर्यकुमारच्या बाबतीत असं झालं नाही. सूर्यकुमार यादवला स्कॉट स्टायरिसने न्यूझीलंडकडून खेळण्याची ऑफर दिली होती. परंतु त्याची फ्रेंचायजी त्याच्या पाठीशी उभी राहिली. बीसीसीआय त्याच्या पाठीशी उभी होती त्यामुळे तो कधीही भारत सोडणार नाही,” असेही पुढे बोलताना दानिश म्हणाला
कनेरियाने स्कॉट स्टायरिसच्या ट्विटचा काढला चुकीचा अर्थ
दानिश कनेरियाने न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरिसच्या ट्विटला गांभीर्याने घेतलं. वास्तविक स्टायरिसने गमतीने हे ट्वीट केलं होतं.
सूर्यकुमार यादव आयपीएल2020 मध्ये जबरदस्त फॉर्मात होता. त्याने आयपीएलच्या या हंगामात सातत्याने उत्तम कामगिरी केली. मात्र, असे असूनही ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी ट्विटरच्या माध्यमातून सूर्यकुमारच्या समर्थनार्थ भाष्य केलं होतं. याचाच भाग म्हणून स्टायरिसने गमतीने ट्वीट केलं होतं.
I wonder if Suryakumar Yadav fancies playing International cricket he might move overseas #CoughNZCough
— Scott Styris (@scottbstyris) October 28, 2020
मलाही दोन देशांकडून मिळाला होता प्रस्ताव -कनेरिया
यादरम्यान दानिश कनेरियाने एक खुलासा केला. तो म्हणाला की, “मला दोन देशांकडून प्रस्ताव आला होता. मी त्यांच्या देशाकडून क्रिकेट खेळावे, अशी त्यांची इच्छा होती. परंतु मी माझा देश सोडून गेलो नाही. मात्र, मागे वळून पाहताना असे वाटते की, मला दुसऱ्या देशात जायला हवं होतं. किमान त्या देशातील क्रिकेट बोर्डाकडून मला सहकार्य मिळालं असतं.”
कनेरिया पाकिस्तानकडून कसोटी खेळणारा पहिला हिंदू
दानिश कनेरिया पाकिस्तानकडून कसोटी सामना खेळणारा पहिला हिंदू खेळाडू आहे. परंतु सामना फिक्सिगंच्या आरोपामुळे त्याला बंदीचा सामना करावा लागला. कनेरियाने पाकिस्तान बोर्डवर भेदभाव करण्याचा आरोपही लावला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
“नटराजन ‘या’ मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज”, माजी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने
रडणाऱ्या मुलाला वडील दाखवत होते भारत- ऑस्ट्रेलिया सामना, पाहा गमतीशीर व्हिडिओ
भारत- ऑस्ट्रेलिया सराव सामना: दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब, पुजारा शून्यावर बाद, तर रहाणे…
ट्रेंडिंग लेख-
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?