टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या पुढे जाता आले नाही. एक मजबूत संघ म्हणून ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय संघाला पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर खेळाडू व संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका होतेय. कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड हे प्रामुख्याने टीकाकारांच्या निशाण्यावर आहेत. भारतीय संघावर टीका करणाऱ्या माजी खेळाडूंच्या यादीत आता नवे नाव वेस्ट इंडिजचा माजी विश्वविजेता कर्णधार डॅरेन सॅमी याचे आले आहे.
भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा असताना संघ पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यात अपयशी ठरला. मागील नऊ वर्षापासून भारतीय संघ एकही आयसीसी स्पर्धा जिंकला नाही. भारतीय संघाच्या या आयसीसी स्पर्धा न जिंकण्याच्या दुष्काळावर बोलताना वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी म्हणाला,
“भारतीय संघ आयसीसी स्पर्धा न जिंकण्याचे मोठे कारण मला तरी हे वाटते की, भारतीय खेळाडू कोणत्याही परदेशातील लीगमध्ये खेळत नाहीत. भारताकडे जगातील सर्वात मोठी टी20 लीग असली तरी भारतीय खेळाडूंना जगातील इतर परिस्थितीत खेळण्याचा इतका अनुभव नाही.”
त्याने इंग्लंडच्या विजयाचे श्रेय देखील बिग बॅश लीगला दिले. तो म्हणाला,
“इंग्लंडचे लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस जॉर्डन, ऍलेक्स हेल्स व कर्णधार जोस बटलर हे सर्व खेळाडू बिग बॅश खेळतात. येथील परिस्थितीचा त्यांना अंदाज असल्याने त्यांनी तसाच खेळ दाखवला.”
डॅरेन सॅमी याच्याच नेतृत्वात वेस्ट इंडीजने दोन वेळा टी20 विश्वचषक आपल्या नावे केला होता. पाकिस्तानमध्ये बरेच फ्रॅंचाईजी क्रिकेट खेळल्यानंतर त्याला यावर्षी पाकिस्तानचे नागरिकत्व देण्यात आले होते. पाकिस्तानचा नागरी पुरस्कार असलेल्या निशान ए हैदरनेही सन्मानित केले गेले आहे.
(Darren Sammy Tell Reason Behind Team India Failure In ICC Events)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिनच्या पदार्पणाच्या वयात ‘या’ केली 407 धावांची खेळी, 50 षटकांच्या सामन्यात घडला इतिहास
आयपीएल 2023पूर्वी गुजरातच्या गोटातून मोठी बातमी, ‘या’ स्टार खेळाडूला केले रिटेन