क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी यासह क्षेत्ररक्षण खूप महत्वाचे असते. कारण एखादा फलंदाज कमी धावा करेल किंवा एखादा फलंदाज गोलंदाजी करताना गडी बाद करण्यात अपयशी ठरेल. परंतु, चांगले क्षेत्ररक्षण नेहमीच संघाच्या हिताचे असते. कारण चांगले क्षेत्ररक्षण करून जास्तीत जास्त धावांचा बचाव करता येऊ शकतो. रविवारी (७ नोव्हेंबर) न्यूझीलंड संघाने पुन्हा एकदा दाखवून दिले की त्यांना जागतिक सर्वश्रेष्ठ क्षेत्ररक्षण करणारा संघ का म्हणतात.
रविवारी (७ नोव्हेंबर) आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत अफगानिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. हा सामना भारत, अफगानिस्तान आणि न्यूझीलंड या तिन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा होता. कारण याच सामन्याच्या निकालावरून टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा चौथा संघ कोण? याचा निकाल लागणार होता.
दरम्यान, न्यूझीलंड संघाने हा सामना तर जिंकलाच यासह न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांनी देखील अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, न्यूझीलंड संघाची गोलंदाजी सुरू असताना शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर राशिद खानने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. सर्वांना वाटले होते की, हा चेंडू ६ धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर जाईल. परंतु, सीमा रेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या मिशेलने मागच्या बाजूने डाईव्ह मारली. त्याला अंदाज आला होता की, तो सीमा रेषेवर पडणार आहे. अशाप्रकारे त्याने आधीच चेंडू आतल्या बाजूने फेकून दिला. ज्यामुळे त्याने संघासाठी ४ धावा वाचवल्या.
हा शॉट देखील अप्रतिम होता, तसेच या शॉटवर सहा धावा मिळाल्याच असत्या, परंतु मिशेलच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे ते साध्य होऊ शकले नाही. जर हा झेल योग्यरीत्या टिपला असता तर हा टी२० स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट झेल असता. आयसीसीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच त्यांनी कॅप्शन म्हणून लिहिले की, “राशीदने हा चेंडू षटकारासाठी पाठवला,परंतु डॅरिल मिशेल मध्ये आला आणि डीपमध्ये अप्रतिम बचाव केला. ”
https://www.instagram.com/reel/CV-T-TDFrGj/?utm_medium=copy_link
या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानला २० षटकांत ८ बाद १२४ धावांवर रोखले होते. त्यानंतर १२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग न्यूझीलंडने २ विकेट्स गमावत १८.१ षटकांत पूर्ण केला आणि सामना जिंकला. याबरोबरच उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पद्म पुरस्कारांचे झाले वितरण; क्रीडाक्षेत्रातील पीव्ही सिंधू, मेरी कोमसह ‘हे’ ८ मान्यवर ठरले मानकरी
‘नामिबियाबरोबरचा सामना खेळणे गरजेचे आहे का?’, भारताच्या अखेरच्या सामन्यापूर्वी मीम्सचा सुळसूळाट
यूएईत पाकिस्तान संघ ‘किंग’!! १६ सामने अन् ८ बलाढ्य संघांना पराभूत करत राहिलाय अजेय