---Advertisement---

न्यूझीलंडच्या मिचेलकडून पुन्हा सभ्यतेचे दर्शन; ‘त्या’ विधानाने जिंकले कोट्यवधी चाहत्यांचे मन

On: गुरूवार, नोव्हेंबर 11, 2021 12:23 PM
---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये लढत होणे साहजिक आहे. फलंदाज हा चौकार आणि षटकार मारण्याच्या प्रयत्नात असतो. तर गोलंदाज फलंदाजाला बाद करण्याच्या प्रयत्नात असतो. असे सुरू असताना अनेकदा वादविवाद देखील होत असतात. गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये काही ना काही कारणावरून वाद होतच असतात. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात देखील मोठा वाद झाला असता. परंतु, फलंदाज आणि गोलंदाजाच्या समजूतदारपणामुळे हा वाद टळला आणि त्यानंतर फलंदाजाने जे काही म्हटले त्याने चाहत्यांचे मन जिंकले आहे.

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड संघाची फलंदाजी सुरू असताना आदिल राशिद १७ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. त्यावेळी जिमी निशाम फलंदाजी करत होता. तर डॅरिल मिचेल नॉन स्ट्राइकवर होता. तर झाले असे की, षटकातील पहिल्या चेंडूवर निशामने सरळ फटका मारला. त्यावेळी दोन्ही फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करत होते.परंतु, गोलंदाजी करत असलेला आदिल राशिद मध्ये आला होता.

धाव घेण्याच्या प्रयत्नात आदिल राशिद आणि मिचेल यांच्यात धडक झाली होती. त्यावेळी मिचेल आणि मिचेल यांनी धाव घेण्यास नकार दिला होता. ही घटना घडल्यानंतर गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये वाद होऊ शकला असता. परंतु, मिचेलने समजुतीपणा दाखवला आणि त्याला निशामने देखील साथ दिली. त्यानंतर पुढील चेंडूवर निशामने आणि चौथ्या चेंडूवर मिचेलने षटकार मारला.

तसेच सामना झाल्यानंतर मिचेलने म्हटले की, “मला तर वाटते की, मीच राशिदच्यामध्ये आलो. मला तो खेळाडू मुळीच नाही बनायचं आहे जो वादविवाद करतो. त्यामुळे मी धाव न घेऊनही खुश होतो. आम्ही सर्व चांगल्या भावनेने खेळतो. मला वाटते की, माझीच चूक आहे. त्यामुळे धावा घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पुन्हा सुरुवात केली.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---