---Advertisement---

श्रीलंकेचा ‘फ्लाईंग’ कर्णधार! तिसऱ्या सामन्यात टिपले दोन अफलातून झेल, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

श्रीलंका आणि भारत यांच्यादरम्यान तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. यजमान श्रीलंकेने अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाचा डाव केवळ ८१ धावांमध्ये गुंडाळून भारताला बॅकफूटवर ढकलले. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाने लाजवाब क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश करत तमान क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. त्याने टिपलेल्या दोन झेलांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शनाकाचे दोन अप्रतिम झेल
प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाला सुरुवातीपासून लागोपाठ धक्के बसले. संघाचे प्रमुख चार फलंदाज केवळ २४ धावांवर माघारी परतले होते. आपला दुसरा सामना खेळणारा नितीश राणा व उपकर्णधार भुवनेश्वर कुमार यांनी भारतीय डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नवव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर गोलंदाजी करत असलेला श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाने स्वतःच्या गोलंदाजीवर नितीश राणाचा डावीकडे झेपावत अफलातून झेल पकडला.

पहिला झेल जितका सुरेख होता त्याहून चांगला झेल शनाकाने वनिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर शॉर्ट कव्हर्समध्ये पकडला. पंधराव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर भुवनेश्वरने मारलेला फटका उजवीकडे सूर मारत शनाकाने झेलला. त्याचे हे दोन्ही झेल मालिकेतील सर्वोत्कृष्ट झेल असल्याचे म्हटले जात आहे.

श्रीलंकेच्या नावे टी२० मालिका
वनडे मालिकेत निसटता पराभव झाल्यानंतर यजमान श्रीलंकेने टी२० मालिकेत जबरदस्त कामगिरी करत मालिका आपल्या नावे केली. टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांना ३८ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघाने अखेरच्या षटकापर्यंत गेलेला सामना आपल्या नावे केला. तिसऱ्या सामन्यात गोलंदाजांनी शानदार कामगिरी करून भारतीय संघाला ८१ धावांवर रोखले होते. हे आव्हान श्रीलंकेने ३ गडी गमावत सहजरित्या पार केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

धोनीला त्रास देणाऱ्या ‘त्या’ गोलंदाजांला टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियात मिळावी संधी, हरभजनने व्यक्त केले मत

इंग्लंड दौऱ्यात ‘हा’ गोलंदाज भारतासाठी ठरेल हुकमी एक्का, डेल स्टेनचा दावा

‘तुम्हाला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही’, अमेरिकन जिम्नॅस्टच्या समर्थनार्थ उतरले रवी शास्त्री

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---