भारतीय क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्या महिला समालोचक म्हणून ओळख मिळवलेल्या चंद्रा नायडू याचं निधन झालं आहे. त्यांनी मनोरमागंज येथे असलेल्या त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला आहे.
त्यांचे रविवारी (४ एप्रिल रोजी ) वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. याबाबत क्रिकेट क्षेत्रातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
चंद्रा नायडू या भारतीय कसोटी संघाचे पहिले कर्णधार सीके नायडू यांच्या कन्या होत्या. त्यांनी समालोचन क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. भारतीय क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या काळात समालोचक म्हणून त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी शोक व्यक्त करत म्हटले की, “त्या देशातील महिला क्रिकेट जगतात, क्रिकेट समालोचन करण्यामध्ये अग्रेसर होत्या. त्यांनी मध्यप्रदेश क्रिकेटला पुढे आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. मला अजूनही आठवत आहे की, वेगवेगळ्या शहरात आयोजित होणाऱ्या सामन्यांमध्ये चंद्रा नायडू राज्यातील महिला क्रिकेट संघांसह व्यवस्थापक आणि इतर भूमिका पार पाडण्यासाठी जात असे आणि खेळाडूंना प्रोत्साहित करत असे.”
चंद्रा नायडू अविवाहित होत्या. त्यांनी १९७७ मध्ये झालेल्या नॅशनल चॅम्पियन्स बॉम्बे आणि एमसीसी यांच्यात झालेल्या सामन्यात पहिल्यांदा समालोचन केले होते. यासोबतच त्यांनी १९८२ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुवर्ण महोत्सवाच्या कसोटी सामन्यात समालोचन केले होते.
यासोबतच त्यांनी आपले वडील सीके नायडू यांच्या जीवनावर “सीके नायडू : ए डॉटर रिमेम्बर्स” हे पुस्तक लिहिले होते. परंतु त्यांना जास्त काळ समालोचन करता आले नाही. त्यांनी इंदोर मधील शासकीय कन्या महिला महाविद्यालयात इंग्रजी प्राचार्यांची भूमिका देखील पार पाडली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
शार्दुल, नटराजन पाठोपाठ सिराजलाही आनंद महिंद्रा यांच खास गिफ्ट; घरी झालं महागड्या कारचं आगमन
आयपीएलमध्ये खेळलेले ५ वयस्कर खेळाडू; एक आहे तब्बल ४५ वर्षांचा