कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक डेविड हसीला युवा फलंदाज शुभमन गिल आणि नितीश राणा यांच्याकडून मोठ्या आशा आहेत. गिल आणि राणा यांनी पहिल्या टप्प्यात फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. पण हसीला विश्वास आहे की, हे दोन खेळाडू आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्यामध्ये क्रिकेट जगताला आश्चर्यचकित करू शकतात.
केकेआरच्या पहिल्या सात सामन्यांमध्ये गिलने १३२ आणि राणाने २०१ धावा केल्या आहेत. भारतात स्पर्धेच्या बायो-बबल वातावरणात कोविड -१९ ची प्रकरणे आढळल्यानंतर आयपीएल पुढे ढकलण्यात आली होती.
हसीने मात्र या दोन खेळाडूंना भारतीय खेळाडूंची पुढची पिढी म्हणून संबोधले आहे आणि म्हटले आहे की, संघाला त्यांच्याकडून मोठ्या आशा आहेत. ‘दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा त्यांचा निर्धार आहे, ते आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही खेळले आहेत. मला वाटते की, ते त्यांच्या कामगिरीने क्रिकेट जगताला आश्चर्यचकित करणार आहेत आणि ते भारतीय संघाची पुढची पिढी आहेत. ते केवळ एक किंवा दोन मालिकाच नव्हे तर कदाचित येत्या दशकापर्यंत आपली छाप सोडू शकतात.’
ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने आशा व्यक्त केली आहे की, कर्णधार ओएन मॉर्गन दुसऱ्या टप्प्यामध्ये चांगली कामगिरी करेल. पहिल्या टप्प्यामध्ये त्याने धावा काढण्यासाठी खूप संघर्ष केला. हसी म्हणाला, ‘कर्णधार म्हणून तो चांगले नेतृत्व करणार आहे. आम्हाला त्याच्याकडून काही मोठ्या खेळींची आवश्यकता आहे. त्यामुळे संघाला एक चांगली धावसंख्या उभी करण्यास आणि विरोधी संघावर दबाव टाकण्यास मदत होईल.’
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. त्यांनी आतापर्यंत सात पैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे, तर पाच सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे. त्यांनी एकूण चार गुण मिळवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
धावबाद झालेल्या फलंदाजाने दुसऱ्या फलंदाजाच्या अंगावर फेकली बॅट, पाहा गमतीदार व्हिडिओ
गेल म्हणतोय, “मी उद्या पाकिस्तानला जात आहे, माझ्याबरोबर कोण येणार?”
युएईत फक्त ऋतुराजचा डंका! कोणालाही न जमलेली अद्वितीय कामगिरी केली नावे