इंडियन प्रीमियर लीग (आयपील) २०२२चा पहिला क्वालिफायर सामना २४ मे रोजी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने राजस्थानचा ७ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. हार्दिक पंड्याच्या संघाला क्वालिफायर सामना जिंकण्यात डेव्हिड मिलर याचा मोलाचा वाटा होता. या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करताना ६८ धावा केल्या. गुजरातने विजयासाठी दिलेले १८९ धावांचे लक्ष्य ३ चेंडू राखून पूर्ण केले. या क्वालिफायर सामन्यात एक वेळ अशी आली जेव्हा डेव्हिड मिलर खूप घाबरला होता. अशा स्थितीत कर्णधार हार्दिक पंड्याने त्याला प्रोत्साहन दिले. खुद्द मिलर यानेच याचा खुलासा केला आहे.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना डेव्हिड मिलर (David Miller) म्हणाला की, “खरं सांगायचं तर क्वालिफायर मॅचमध्ये मी नर्व्हस होतो, पण हार्दिक पंड्या (Hardik pandya) याने चांगले शॉट्स खेळूया आणि चेंडू गॅपमध्ये मारूया असे म्हणत राहिला. तो फार वेगाने धावत नव्हता हे तुमच्या लक्षात आलेच असेल. मला विकेट्सच्या दरम्यान धावायला खूप मजा येते.” मिलर पुढे म्हणाला, “हार्दिक हा खूप शांत व्यक्ती आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्याबाबतही तो शांत होता.”
या महत्त्वपूर्ण क्वालिफायर सामन्यात डेव्हिड मिलरने कर्णधार हार्दिक पंड्यासोबत १०६ धावांची भागीदारी केली. मिलर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. हार्दिकने या सामन्यात २७ चेंडूत ४० धावांची धडाकेबाज खेळी खेळली.
दुसरीकडे डेव्हिड मिलरने ३८ चेंडूत ६८ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ५ षटकार मारले. अखेरच्या षटकात गुजरातला सामना जिंकण्यासाठी १६ धावांची गरज होती. मिलरने शेवटच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर सलग ३ षटकार ठोकत सामना गुजरातच्या झोळीत टाकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्यांच्यामुळेच मी चांगला क्रिकेटर बनू शकलो’, हार्दिकने यशाचे श्रेय दिले ‘या’ तिघांना
Qualifier 1| गुजरातविरुद्ध राजस्थानकडून झाल्या ३ मोठ्या चूका; अश्विन-चहलही ठरले पराभवाचे कारण
लिलावात पहिल्याच दिवशी अनसोल्ड राहिलेला मिलर राजस्थानला भारी पडत ‘असा’ झालेला गुजरातमध्ये सामील