पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ ‘यॉर्गर स्पेशलिस्ट’ म्हणून ओळखला जातो. लाहोर कलंदर्स आणि मुलतान सुलतान्स संघातील सामन्याने पाकिस्तान प्रमियर लीग 2023 चा सुरुवात झाली. सोमवारी (13 फेब्रुवारी) मुलतानमध्ये खेलल्या गेलेल्या या सामन्यात लाहोर कलंदर्स संघ जिंकला. लाहोर संघाचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ चर्चेचा विषय ठरला. त्याने टाकलेल्या एका घातक यॉर्कर चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज डेविड मिरल क्लीन बोल्ड झाला.
पीएसएल 2023 मधील पहिला सामना चाहत्यांसाठी चांगलाच रंचक ठरला. मुलतान सुलतान्स (Multan Sultans) संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत विजयासाठी प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. अवघी एक धाव कमी पडल्यामुळे मुलतान संघ पीएसएल 2023 (PSL 2023) ची सुरुवात गोड करू शकला नाही. लाहोर संघाला मिळालेल्या विजयात वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ (Haris Rauf Yorker) याचे योगदान महत्वाचे ठरले. रौफने या सामन्यात 4 षटकात 37 धावा खर्च करून एक विकेट घेतली, जी अतिशय महत्वाची होती.
मुलतान संघाला विजयासाठी 176 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मुलत्याच्या डावातील 19 वे षटक टाकण्यासाठी हॅरिस रौफ आला. या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने डेविड मिलर (David Miller) याला तंबूत धाडले. एक जबरदस्त यॉर्कर टाकून रौफने मिलरला क्लीन बोल्ड केले. चेंडू अगदी योग्य टप्प्यावर पडल्यामुळे मिलरला विकेट गमवावी लागली. मिलरने हा चेंडू खेळण्यासाठी एक पाय ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता, पण चेंडू मात्र त्याच्या दुसऱ्या पायाच्या खालून थेट स्टंप्समध्ये घुसला. मिलरने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अनेकदा अशा पद्धतीने शॉट मारताना दिसतो. पण डेविड मिलरला हा शॉट खेळता आला नाही. या अप्रतिम चेंडूसाठी रौफचे सध्या सर्वत्र कौतक केले जात आहे.
मिरलने विकेट गमावली तेव्हा मुलता संघाला विजायासाठी 12 चेंडूत 29 धावांची आवश्यकता होती. 20 चेंडूत 25 धावा करून मिलरने विकेट गमावली. जर तो अजून काही वेळ खेळपट्टीवर टिकला असता, तर सामन्याचा निकाल देखील वेगळा असू शकत होता. फखर झमान याने लाहोरकडून खेळताना 42 चेंडूत 66 धावा कुटल्या आणि यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित देखील केले गेले. मुलतानसाठी मोहम्मद रिझवानने 50 चेंडू 75 धावा कुटल्या, पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. (David Miller clean bowled on Harris Rauff’s dangerous yorker)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला ‘हा’ भारतीय खेळाडू, जसप्रीत बुमराहचा निर्णयही झाला
टीम इंडियाच्या मॅचविनरकडून ‘बिग बॉस’ विजेत्या एमसी स्टॅनचे अभिनंदन, केली खास सोशल मीडिया पोस्ट