---Advertisement---

या संघाचा प्रतिभावान खेळाडू म्हणतो, ‘धोनीसारखेच मलाही चांगला फिनिशर बनायचे आहे’

On: बुधवार, सप्टेंबर 16, 2020 2:35 PM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा अनेक युवा खेळाडूंसाठी आदर्श राहिला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरचाही समावेश आहे. डेव्हिड मिलर हा दक्षिण आफ्रिकेचा संघाचा एक प्रतिभावान खेळाडू आहे. यंदा तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळणार आहे. तो एमएस धोनीचा चाहता आहे.

धोनीच्या सामना संपवण्याच्या क्षमतेवर तो म्हणाला, “धोनी नेहमी शांत राहतो म्हणून आपल्याला वाटते की सर्व काही नियंत्रणात आहे. त्याच्याकडे सामर्थ्य आहे. फलंदाज म्हणून त्याच्यात काही कमतरतासुद्धा आहेत आणि त्या प्रत्येक खेळाडूंमध्ये असतात. माझ्यात सुद्धा कमतरता आहेत. तो जसा सामना संपवतो तसाच मला सुद्धा सामना संपवायचा आहे. धोनी सर्वोत्तम फिनिशर आहे. मला त्याची फलंदाजी आवडते.”

नुकतेच मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतली आहे. पण तो आयपीएल २०२० मध्ये खेळताना दिसणार आहे. तो चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे.

तसेच यावर्षी राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा डेव्हिड मिलर याआधी किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ७९ सामने खेळले असून १८५० धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---