बुधवारी(18 सप्टेंबर) मोहाली येथे पार पडलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने नाबाद 72 धावा करत महत्त्वाचा वाटा उचलला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभव स्विकारावा लागला असला तरी त्यांचा क्रिकेटपटू डेव्हिड मिलरने घेतलेल्या एकहाती झेलची मोठी चर्चा झाली. हा झेल पाहुन विराटही आश्चर्यचकीत झाला होता.
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट आणि शिखर धवनची 61 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रंगली होती. पण मिलरने ताब्राईज शम्सीने गोलंदाजी केलेल्या 12 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शिखरचा 40 धावांवर असताना झेल घेतला आणि ही भागीदारी संपवली.
शिखरने शम्सीने टाकलेल्या या चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो चेंडू चौकार जाईल असे वाटले होते. परंतू लॉन्ग ऑनला असणाऱ्या मिलरने त्याच्या उजवीकडे हवेत उडी मारत एका हाताने चेंडू झेलला. त्यामुळे शिखरला त्याची विकेट गमवावी लागली. विशेष म्हणजे हा झेल पाहून विराट आणि शिखरही आचंबित झाले होते.
सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 149 धावा केल्या होत्या आणि भारतासमोर विजयासाठी 150 धावांचे आव्हान ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार क्विंटॉन डीकॉकने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तसेच तेंबा बाउमाने 49 धावांची खेळी केली.
भारताकडून दीपक चाहरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजा, नवदीप सैनी आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्यानंतर 150 धावांचे आव्हान भारताने 19 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.
2 stunning catches from #IndvsSA T20
Virat takes a stunner https://t.co/oLrE5OtePSMiller's catch of Shikhar https://t.co/rGfwAFogHu
— Phani Shankar (@phanishankar) September 18, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–वाढदिवस विशेष: राशिद खान विषयी माहित नसलेल्या ५ खास गोष्टी…
–टीम इंडियाकडून सुमार कामगिरी करणारा रिषभ पंत आता खेळणार या संघाकडून
–किंग कोहलीने केला खूलासा, या कारणामुळे होतात सातत्याने मोठ्या धावा