कोरोना व्हायरसमुळे सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक क्रिकेटपटूंनी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळवला आहे. अनेक क्रिकेटपटू टिक-टॉकवर व्हिडिओ अपलोड करत आहेत. भारताचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहलनंतर आता ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरही टिक-टॉकवर व्हिडिओ बनवत आहे.
वॉर्नरने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत वॉर्नरने कॅप्शन दिले की, “कृपया कोणीतरी आमची मदत करा.” या व्हिडिओत तो आपल्या लाडक्या मुलीसोबत दिसत आहे. या व्हिडिओत वॉर्नर (David Warner) आणि त्याची मुलगी हिंदीतील ‘शीला की जवानी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/B_HMVlcJMAS/?utm_source=ig_web_copy_link
वॉर्नरने नुकतेच टिक-टॉकवर (Tik-Tok Video) व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती. तसेच आपले व्हिडिओ शेअरही केले होते. त्याने सांगितले की, आपल्या मुलीच्या सांगण्यावरून तो टिक-टॉकशी जोडला गेला आहे. त्याने आपल्या चाहत्यांशी यासाठी मदतदेखील मागितली होती.
वॉर्नरने आपल्या मुलीसोबत गाणे गातानाचा व्हिडिओ शेअर केला होता. तसेच यावेळी लिहिले होते की, “मला खरंच माहिती नाही की काय चालले आहे.”
https://www.instagram.com/p/B-9PPG-JhVp/?utm_source=ig_web_copy_link
वॉर्नर आयपीएलमधील एक उत्कृष्ट फलंदाज आहे. तसेच त्याच्याकडे पुन्हा एकदा सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाचे नेतृत्व सोपविले आहे. त्याने आयपीएलमध्ये अनेक विक्रम केले आहेत. तो आपल्या संघासाठी दरवर्षी चांगल्या धावा करतो.
यावर्षी कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) आयपीएल २०२० चा १३ वा हंगाम अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-२०१०पासून चौथ्या क्रमांकावर वनडेत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय
-मॅच फिक्सिंग होऊ नये म्हणून बीसीसीआय खेळाडूंच्या नकळत करते या गोष्टी
-गांगुली- धोनीत खूप वेगळेपण, जे गांगुलीने केलं त्याच्या बरोबर उलटं धोनीने केलं