---Advertisement---

‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड; ‘या’ धाकड फलंदाजाचे मेलबर्नमध्ये आगमन

On: रविवार, डिसेंबर 20, 2020 2:11 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर वेळेपूर्वी मेलबर्नला पोहोचला आहे. सोबतच ऑस्ट्रेलियन गोलंदाज सीन ऍबॉटही मेलबर्नला आला आहे. खासगी विमानाद्वारे दोघेही मेलबर्नमध्ये दाखल झाले आहेत. सिडनी शहरातील कोव्हिड-१९ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे व्हिक्टोरिया सिडनीवरुन येणाऱ्या लोकांसाठी सीमा बंद करू शकते. याच कारणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी (१९ डिसेंबर) वॉर्नर आणि ऍबॉट यांना मेलबर्नसाठी रवाना केले होते.

सिडनी मॉर्निंग हेराल्डमधील वृत्तानुसार, वॉर्नर आणि ऍबॉट हे दोन्ही खेळाडू कोव्हिड-१९ हॉटस्पॉट भागात गेले नसले, तरीही क्रिकेट ऑस्ट्रेलियाला कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नाही. त्यामुळे मेलबर्नमध्ये असलेल्या ऑस्ट्रेलिया संघासोबत सहभागी करण्यापूर्वी त्यांना तीन दिवस विलगीकरणात ठेवण्यात येईल.

वॉर्नर आणि ऍबॉट यांना भारतीय दौऱ्यावरील १७ सदस्यीय कसोटी संघात स्थान देण्यात आले होते. परंतु मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान दुखापत झाल्यामुळे त्यांना ऍडलेड येथील दिवस- रात्र कसोटी सामन्याला मुकावे लागले.

वॉर्नरने दिले होते पुनरागमनाचे संकेत
यापूर्वी स्वत: वॉर्नरने मेलबर्नमध्ये होणारा ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना खेळण्याविषयी माहिती दिली होती. रेडिओ नेटवर्क सेनशी बोलताना वॉर्नर म्हणाला होता की, “मी दुखापतीमुळे ऍडलेड येथील दिवस- रात्र कसोटी सामना खेळू शकलो नाही. याचे मला खूप वाईटही वाटत आहे. कारण इतक्या मोठ्या मालिकेच्या कोणत्याही सामन्याचा भाग नसणे खूप दुर्दैवी गोष्ट आहे, असे मला वाटते. मी अपेक्षा करतो की, पहिल्या कसोटी सामन्यानंतर मी पुनरागमन करेल. सध्या मी दर ताशी १४ किलोमीटर वेगाने धावू शकत आहे. अपेक्षा करतो ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यापूर्वी मी २६-३० किलोमीटर दर ताशी वेगाने धाव घेईल.”

ऑस्ट्रेलिया संघाची चिंता घटली
नुकत्याच ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ८ विकेट्सने नमवले. यानंतर २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान मेलबर्नमध्ये ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना होईल. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या सामन्याचा भाग नसेल. सोबतच ऑस्ट्रेलिया संघात वॉर्नरचे पुनरागमन होईल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटी सामन्यात बराच फायदा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात टीम इंडियापुढे मोठे आव्हान, ‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर दुखापतीतून बरा

सिडनीत करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने तिसरा कसोटी सामना संकटात? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केली परिस्थिती

व्हिडिओ: नुकत्याच वडील बनलेल्या विलियम्सनचे न्यूझीलंड संघात पुनरागमन, सहकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---