Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वॉर्नरने मोडला हेडनचा विक्रम! टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी ‘अशी’ कामगिरी करणारा बनला पहिल्या क्रमांकाचा फलंदाज

November 14, 2021
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/T20WorldCup

Photo Courtesy: Twitter/T20WorldCup


रविवारी (१४ नोव्हेंबर) टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियावर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली आणि मोठे आव्हान उभे केले. प्रत्युत्यरात ऑस्ट्रेलियाने देखील चांगल्या प्रकारे लक्ष्याचा पाठलाग केला आणि पहिले टी२० विजेतेपद जिंकले. ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर डेविड वार्नर आणि मिचेल मार्शने मोलाचे योगदान दिले. सलामीवीर डेविड वार्नने या सामन्यात स्वत:च्या नावावर एक महत्वाच्या विक्रमाची नोंद केली आहे.

डेविड वार्नरने या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी ३८ चेंडूत ५३ धावा केल्या. यामध्ये त्याच्या चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. त्याने केलेल्या या महत्वपूर्ण खेळीसोबत त्याने स्वत:च्या नावावर एक खास विक्रमाची नोंद केली आहे. वार्नर या खेळीनंतर ऑस्ट्रेलियासाठी एका टी२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

त्याने २०२१ टी२० विश्वचषकात ७ सामन्यांत ४८.१६ च्या सरासरीने २८९ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने मॅथ्यू हेडनला मागे टाकले आहे. यापूर्वी मॅथ्यू हेडनने ऑस्ट्रेलियासाठी २००७ टी२० विश्वचषकात सर्वाधिक २६५ धावा केल्या होत्या. त्याने त्याचा शेवटचा टी२० विश्वचषक २००७ मध्ये खेळला होता. वार्नरने रविवारच्या सामन्यादरम्यान हेडनचा हा विक्रम मोडला आहे.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर शेन वॉट्सन आहे, ज्याने २०१२ टी२० विश्वचषकात एकूण २४९ धावा केल्या होत्या. वॉट्सनने त्याचा शेवटचा टी२० विश्वचषक २०१२ मध्येच खेळला होता.

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावा केल्या. न्यूझीलंड संघाने ज्या चार विकेट्स गमावल्या, त्यापैकी तीन विकेट्स ऑस्ट्रेलियाच्या एकट्या जोस हेजलवुडने घेतल्या. त्याने त्याच्या चार षटकात अवघ्या १६ धावा दिल्या. त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या ऍडम झम्पाने एक विकेट्स घेतला आणि २६ धावा दिल्या. न्यूझीलंडसाठी सर्वाधिक ८५  धावा केन विलियम्सनने केल्या.

यानंतर ऑस्ट्रेलियासाठी डेविड वॉर्नरसह (५३) मिचेल मार्शने तुफान फटकेबाजी केली. मार्शने नाबाद ७७ धावांची खेळी केली. या दोघांनी ९२ धावांची भागीदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकात २ विकेट्स गमावत १७७ धावांचे लक्ष्य गाठले. याबरोबरच टी२० विश्वचषकावर नाव कोरले.

महत्त्वाच्या बातम्या – 

मॅचविनिंग खेळीसह मार्शने बनवला विश्वचषक अंतिम सामन्यातील सर्वात मोठा विक्रम; दिग्गजांना सोडले मागे

‘बिग फायनल’मध्ये हेजलवूडने दाखवला ‘जोश’; इरफानच्या ‘त्या’ विक्रमाची केली बरोबरी

स्टार्क-गप्टिलची अंतिम सामन्याच्या पहिल्या चेंडूवर ‘न भूतो’ कामगिरी


Next Post
Photo Courtesy: Twitter/T20WorldCup

टी२० विश्वचषक जिंकला, पण ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क ठरला सर्वात महागडा गोलंदाज, पाहा आकडेवारी

Photo Courtesy: Twitter/T20WorldCup

मोठ्या सामन्यांत विलियम्सन ठरतोय न्यूझीलंडचा लढवय्या खेळाडू; गंभीर, कॅलिससारख्या दिग्गजांच्या यादीत सामील

Photo Courtesy: Twitter/T20WorldCup

वॉर्नरने अर्धशतक तर केलेच, पण 'हा' मोठा विक्रमही रचला; विराटचा विश्वविक्रम मात्र अबाधित

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143