ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याला टी२० विश्वचषक २०२१ (2021 T20 World Cup) मध्ये शानदार कामगिरी केल्याबद्दल मोठा पुरस्कार मिळाला आहे. वॉर्नरची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली आहे. वॉर्नरने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी आणि पाकिस्तानचा फलंदाज आबिद अली यांना मागे टाकत हा बहुमान मिळवला. (ICC Player Of The Month)
डेव्हिड वॉर्नरने टी२० विश्वचषक २०२१ मध्ये ४८.६१ च्या सरासरीने २८९ धावा केल्या होत्या. संपूर्ण स्पर्धेत वॉर्नरच्या बॅटमधून १० षटकार, ३२ चौकार निघाले होते. वॉर्नरच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव करून पहिल्यांदाच टी२० विश्वचषक जिंकला. (T20 World Cup Winner Australia)
वॉर्नरला आयसीसीकडून हा सन्मान मिळणेही मोठी गोष्ट आहे. कारण, तो खेळाडू टी२० विश्वचषकापूर्वी अनेकांच्या निशाण्यावर होता. आयपीएलमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या वॉर्नरला सनरायझर्स हैदराबादने कर्णधारपदावरून काढून टाकले होते. तसेच, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळत नव्हते. (Sunrisers Hyderabad David Warner)
महिला क्रिकेटपटूंमध्ये वेस्ट इंडिजची अष्टपैलू खेळाडू हेली मॅथ्यूज (Healy Matthews) नोव्हेंबर महिन्याचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर म्हणून निवडण्यात आले. मॅथ्यूजने पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत ५७, २६ आणि ४९ धावा करत ३ बळी घेतले. तीने बांगलादेशच्या नादिया अख्तर आणि पाकिस्तानची फिरकीपटू अनम अमीन यांचा पराभव केला.
आयसीसीने २०२१ मध्ये महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू हा पुरस्कार सुरू केला होता. भारतासाठी आतापर्यंत हा पुरस्कार रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन व भुवनेश्वर कुमार यांनी मिळवला आहे.तर, ऑक्टोबर महिन्याचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून पाकिस्तानच्या असिफ अली याची निवड झाली होती. भारताच्या एकाही महिला क्रिकेटपटूला आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळवता आला नाही. जून महिन्यात स्नेह राणा व शेफाली वर्मा यांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयएसएल: नॉर्थ ईस्ट युनायडेटविरुद्ध हैदराबाद एफसीचे पारडे जड; अव्वल चौघांत स्थान पटकावण्याची संधी
रोहितने दिले संकेत, ३५ वर्षांचा ‘हा’ गोलंदाज ठरू शकतो भारतीय संघातील हुकमी एक्का