सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल २०२१ स्पर्धेत सुर गवसताना दिसून येत नाहीये. रविवारी (२ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यातही त्यांना ५५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपद डेविड वॉर्नरकडे होते. परंतु डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघाला एकच विजय मिळवण्यात यश आले होते. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. इतकेच नव्हे तर त्याला प्लेइंग ११ मध्ये देखील संधी मिळाली नव्हती. तरीदेखील मैदानाबाहेर राहून त्याने कोट्यवधी चाहत्यांचे मन जिंकले आहे.
डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत ६ सामने खेळले होते. यामध्ये त्याला एकाच सामन्यात विजय मिळवून देण्यात यश आले होते. त्यामुळे डेविड वॉर्नरऐवजी केन विलियम्सनला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. इतकेच नव्हे तर, राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये देखील संधी मिळाली नव्हती.
हे पाहून चाहत्यांनी देखील सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. याउलट डेविड वॉर्नरने सर्वांचे मन जिंकत ‘वॉटरबॉयची ‘ भूमिका पार पाडली. त्यामुळे वॉर्नरचे सर्वत्रच कौतुक केले जात आहे. तर अनेकांनी त्याची अवस्था पाहून नाराजी व्यक्त केली आहे.
David warner having a race for drinks 😂😂🥺#IPL2020 #SRHvRR #srh #DavidWarner pic.twitter.com/jEQPs0kbpD
— Rohith (@Rohith_Crico) May 2, 2021
David Warner happily collecting balls running here and there outside the fence and throwing inside instead of sitting in the dugout. He's so passionate about involving himself in the game, hard days for him. pic.twitter.com/WQ2uCn1A0T
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 2, 2021
Feeling bad for Warner… It's not fair, He is the man behind the success of SRH…. He is the lone wolf
Bring him back in the next matches, can't see him out of the 11 #Bringwarnerback #DavidWarner pic.twitter.com/MMzPTRdppU— Akshat Jain🇮🇳 (@Jain__akshat) May 2, 2021
The saddest part of today's #SRHvsRR #DavidWarner pic.twitter.com/nJi2o4Krr1
— Avii:'( (@Avani_4321) May 2, 2021
Don't forget to follow me for great tweets & slanders
— Nitin (@Nitin__10) May 2, 2021
Don't send him as water boy atleast 🙏🏻
— ee sala cup namde (@srujay_d) May 2, 2021
Not a SRH fan, buts its heartbreaking to see Warner like this💔😭#DavidWarner #RRvsSRH pic.twitter.com/vOtXbrGpCe
— Afry (@ayyoafry) May 2, 2021
सामना सुरू असताना वॉर्नर अनेकदा मैदानात येऊन खेळाडूंना ड्रिंक, टॉवेल आणि हेल्मेट देताना दिसून आला होता. हे पाहून चाहतेही भारावून गेले आहेत. तसेच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो हेल्मेट धरून बसला आहे. तसेच त्याला अश्रू देखील अनावर झाल्याचे दिसून येत आहे. त्याचा संघ सहकारी त्याला धीर देताना दिसून येत आहे.
Warner is crying..😭 can't see him like this.. Winning or losing is a part of game. SRH's management is so worst.#DavidWarner#SRHvsRR#OrangeOrNothing #RRvSRH pic.twitter.com/Kbd26L7vCE
— Smrati dubey (@SmratiKiTweet) May 2, 2021
सनरायझर्स हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक ट्रेवर बेलीस यांनी म्हटले की, “डेविड वॉर्नरला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवणे खूप कठीण निर्णय होता. परंतु या हंगामात संघाची निराशाजनक कामगिरी पाहता हा निर्णय घेणे गरजेचे होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पंतची विकेट पंतच घेऊ शकतो! मोठा शॉट खेळण्याच्या नादात रिषभच्या हातून सुटली बॅट अन्…
व्हिडिओ : सनरायझर्स हैद्राबादची गचाळ फिल्डिंग! बटलर आणि सॅमसनचे सोडले सोपे झेल
गोंधळच गोंधळ! विकेट वाचवण्याच्या नादात दोन्ही फलंदाज धावले एकाच एंडला, पाहा व्हिडिओ