ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner) खूप आनंदाची बातमी येतेय. या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूवर असलेली 2018 पासूनची कर्णधारपदाची बंदी उठवण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वॉर्नरवर कर्णधारपदाची आजीवन बंदी घातली होती. जी आता 6 वर्षांनंतर उठवली आहे.
डेव्हिड वॉर्नरवरील आजीवन कर्णधारपदाची बंदी उठल्याने तो आता बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्सचा कर्णधार होण्यासाठी पात्र झाला आहे. अनुभवी सलामीवीराने या महिन्याच्या सुरुवातीला 3 सदस्यांच्या स्वतंत्र पॅनेलसमोर आपली बाजू मांडली होती. वॉर्नरने त्याच्यावरील बंदी तात्काळ उठवण्याचे सर्व निकष पूर्ण केले असल्याचे या पॅनलला आढळले.
वॉर्नरच्या या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पॅनेलच्या वतीने असे सांगण्यात आले की, “त्याची उत्तरे सकारात्मक होती. तसेच त्याच्या बोलण्यात पश्चाताप दिसत होता. त्यानंतर पॅनेलने एकमताने निर्णय घेतला आहे की, तो भविष्यात कर्णधार बनवू शकतो. ही जबाबदारी तो प्रामाणिकपणे पार पाडेल.”
आजीवन बंदी लादल्यापासून वॉर्नरची वागणूक खूप चांगली होती. त्याने स्वतःमध्ये खूप बदल केल्याचे दिसते. याचे उदाहरण म्हणजे तो आता विरोधी संघाला स्लेज करण्याचा किंवा चिथावणी देण्याचा प्रयत्न करत नाही. आजीवन कर्णधारपदाच्या बंदीतून मुक्त झाल्यानंतर, हा माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू आता ऑस्ट्रेलियाच्या टी20 लीग बिग-बॅश लीग 2024-25 साठी सिडनी थंडर्सचे नेतृत्व करू शकतो. आता त्याला संघाचे कर्णधारपद दिले जाते की नाही, हे पाहणे बाकी आहे.
2018 मध्ये ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. जिथे ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमेरून बॅनक्रॉफ्टने केपटाऊन कसोटी सामन्यादरम्यान बॉल टॅम्परिंग केले होते. ज्यामध्ये नंतर ही योजना उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने बनवल्याचे उघड झाले. अशा परिस्थितीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वॉर्नरवर 2 वर्षांची बंदी घातली आणि त्याच्यावर आजीवन कर्णधारपदाचीही बंदी घातली.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल लिलावात कोणत्याही किंमतीत सुंदरला विकत घेऊ शकते सीएसके, वाचा यामागील कारणे
भारत-अफगाणिस्तान संघात रंगणार सेमीफायनल थरार! कधी आणि कुठे होणार सामने
पहिल्या वनडेत भारताने विश्वविजेत्या न्यूझीलंडला केले चित, टी20 विश्वचषकातील पराभवाचा काढला वचपा