---Advertisement---

भारत-अफगाणिस्तान संघात रंगणार सेमीफायनल थरार! कधी आणि कुठे होणार सामने

On: गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024 10:28 PM
---Advertisement---

भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) संघात पुरुष टी20 इमर्जिंग आशिया चषक सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना होणार आहे. भारताने ब गटातून तर अफगाणिस्तानने अ गटातून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असून आता दोन्ही संघांमध्ये सेमीफायनलचा थरार पाहायला मिळणार आहे.

भारत अ संघाने आपल्या गटातील साखळी सामन्यात चमकदार कामगिरी केली. संघाने तिन्ही सामन्यांवर वर्चस्व गाजवले. भारताने ओमान, यूएई आणि पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) भारतीय संघासाठी फलंदाजीत चमकदार कामगिरी केली आणि अनेक अप्रतिम खेळी खेळल्या. दुसरीकडे अफगाणिस्तानने त्यांच्या गटातील 3 पैकी 2 सामने जिंकले होते आणि 1 सामना गमावला होता. संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिला आणि त्यामुळे सेमीफायनलसाठी पात्र ठरला.

भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ संघातील सेमीफायनल सामना शुक्रवार (25 ऑक्टोबर) रोजी अमिराती येथे होणार आहे. दोन्ही संघातील ही लढत (25 ऑक्टोबर) रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना टीव्हीवर पाहायचा असेल तर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान अ संघांमधला सामना हाॅटस्टारवर देखील पाहता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पहिल्या वनडेत भारताने विश्वविजेत्या न्यूझीलंडला केले चित, टी20 विश्वचषकातील पराभवाचा काढला वचपा
“बाबर आझम लवकरच पुनरागमन करेल”, पाकिस्तानच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला विश्वास
भारतीय संघानं वगळल्यामुळे केएल राहुलला बसणार मोठा फटका?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---