इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने चांगली कामगिरी केली. सांघिक कामगिरीच्या बळावर या संघाने प्ले ऑफमध्ये स्थानही मिळवलं. मात्र, क्वालिफायार 2 सामन्यात हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सने पराभव केला. त्यामुळे या संघाचं आव्हान संपुष्टात आलं. संघ बाहेर पडल्यानंतर डेविड वॉर्नरने एक व्हिडीओच्या माध्यमातून एक खास संदेश दिला आहे. यामध्ये त्याने हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजनचा खास उल्लेख केला आहे.
काही दिवसांआधी नोव्हेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. या संघात कोलकाता नाईट रायडर्सचा युवा फिरकीपटू वरूण चक्रवर्तीला स्थान देण्यात आलं होतं. मात्र, खांद्याच्या दुखापतीमुळे वरूण या मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वरूणच्या जागी टी नटराजनला संधी दिली आहे.
या हंगामात टी नटराजनने त्याच्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले. बीसीसीआयच्या राष्ट्रीय संघ निवडकर्त्यांनीही याची दखल घेतली आहे. त्याने या हंगामात 8.02 च्या इकोनॉमिने 16 सामन्यात 16 बळी घेतले आहे.त्याने हंगामात 65 यॉर्कर चेंडू फेकले आहेत, जे इतर कोणत्याही गोलंदाजांपेक्षा तीन पट जास्त आहेत.
याबद्दल हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर 29 वर्षीय नटराजनचे अभिनंदन करण्यास उत्सुक होता. सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वॉर्नरने या हंगामातील अनुभवाविषयी सांगितले आहे.
त्याने कठीण परिस्थितीत संघाच्या पाठीशी उभे असणाऱ्या हैदराबादच्या चाहत्यांचे आणि सर्व सहाय्यक कर्मचार्यांचे आभार मानले. पुढच्या वर्षी परत येईन असेही तो म्हणाला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नटराजनची निवड झाली याबद्दल बोलताना वॉर्नर म्हणाला की, “अभिनंदन नट्टू! मी तुला ऑस्ट्रेलियामध्ये भेटेल.”
A few words from the captain as we conclude a memorable season 🧡@davidwarner31 #OrangeArmy #KeepRising #IPL2020 pic.twitter.com/QNRyRQ3q4C
— SunRisers Hyderabad (@SunRisers) November 9, 2020
राखीव गोलंदाज म्हणून नटराजन ऑस्ट्रेलिया दौर्यावर येण्यास आधीच तयार होता. त्यातच वरुणच्या दुखापतीमुळे संघात पोकळी निर्माण झाली होती आणि ती पोकळी नटराजनने भरून काढली. त्याने आपल्या अचूक यॉर्कर चेंडूने फलंदाजांना लक्ष्य केले. त्याच्या अचूक यॉर्कर्सने वॉर्नरलाही प्रभावित केले आणि त्याला संघात संधी मिळाली आणि आता तो ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वॉर्नरचा सामना करेल. वॉर्नरने नटराजनचा “या हंगामातील शोध” असाही उल्लेख केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात
IPL – फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, प्रत्येक खेळाडूला ‘ही’ गोष्ट समजायला हवी
…..म्हणून हार्दिक पंड्याने आयपीएलमध्ये केली नाही गोलंदाजी, अंतिम सामन्याआधी कर्णधारानेच केला खुलासा
ट्रेंडिंग लेख
विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
भावा तु संघात असलास की दिल्लीचे चाहते शेवटपर्यंत निवांत असतात; पाहा कोण आहेत दिल्लीचे संकटमोचक