---Advertisement---

एक हात फ्रॅक्चर असतानाही दिली काट्याची टक्कर, वॉर्नरच्या मुलीचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल

On: बुधवार, मार्च 3, 2021 1:56 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन संघाचा डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज डेविड वॉर्नर हा मैदानात फलंदाजी करताना लांब लांब षटकार मारत प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. यासोबतच तो सोशल मीडियावर देखील प्रचंड ऍक्टिव असतो. तो कुटुंबासोबत वेळ घालवत असताना अनेक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत असतो. त्याने हिंदी गीतांवर अनेक टिकटॉक व्हिडिओ बनवून देखील शेअर केले होते. अशातच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याने त्याच्या मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे.

आपल्या मुलींसोबत खेळत असताना किंवा मस्ती करत असतानाचे व्हिडिओ वॉर्नर नेहमीच शेअर करत असतो. अशातच नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याची मुलगी एव्ही मे टेनिस खेळताना दिसत आहे. मुख्य बाब म्हणजे, तिचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. तरीसुद्धा ती एखाद्या चांगल्या टेनिस खेळाडूला लाजवेल असे, फोर हॅण्ड आणि बॅक हॅण्ड फटके मारत आहे.

या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडिओखाली वॉर्नरने लिहले आहे की, “माझी मोठी मुलगी एव्ही मे, तिच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून सुद्धा ती टेनिस शिकत आहे.” यापुढे त्याने स्माइलीचे इमोजी टाकले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेतून वॉर्नरला दुखापतीमुळे संघाबाहेर जावे लागले होते. त्याला ग्रोइन (मांडीचा सांधा आणि पाठचा भाग) इंजरी झाली होती. त्यांनतर त्याने कसोटी मालिकेत पुनरागमन केले, परंतु दुखापतीचा परिणाम त्याच्या खेळावर स्पष्टपणे दिसून आला होता.

याविषयी बोलताना त्याने म्हटले होते की, “या दुखापतीतून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी ६ ते ९ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. ४ मार्च रोजी मी न्यू साऊथ वेल्स संघासाठी खेळणार आहे.”

https://www.instagram.com/p/CL6O0LmF0A4/?utm_source=ig_web_button_share_sheet

डेव्हिड वॉर्नरची कामगिरी

डेव्हिड वॉर्नर येत्या आयपीएल २०२१ हंगामात सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दिसणार आहे. अशातच त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियन संघासाठी खेळलेल्या ८६ कसोटी सामन्यात ४८.१ च्या सरासरीने ७३११ धावा केल्या आहेत. यात एक तिहेरी शतकाचा समावेश आहे. तर २४ शतक आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच १२८ एक दिवसीय सामन्यात ४५.५ च्या सरासरीने त्याने ५४५५ धावा ठोकल्या आहेत. यात १८ शतक आणि २३ अर्धाशकांचा समावेश आहे. यासोबतच ८१ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३१.४ च्या सरासरीने त्याने २२६& धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बापरे बाप! ५४४७ चेंडू अन् १९८१ धावा, कसोटी इतिहासातील सर्वात मोठा सामना; ‘इतके’ दिवस झालती मॅच

… म्हणून पुजारा डावखुऱ्या फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर होतोय बाद, माजी प्रशिक्षकाने हेरली चूक

Video: जड्डू इज बॅक! भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, वनडे मालिकेपूर्वी मैदानावर परतला जडेजा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---