---Advertisement---

वॉर्नरने त्याच्यामुळे दुखापतग्रस्त झालेल्या या गोलंदाजाला दिली खास भेट, पहा व्हिडिओ

---Advertisement---

आज(15 जून) 2019 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघात द ओव्हल मैदानावर सामना सुरु आहे. पण हा सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरकडून एक खास गोष्ट पहायला मिळाली. त्याने हा सामना सुरु होण्याआधी जयकिशन प्लाहा या नेट बॉलरला स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली आहे. जयकिशनला काही दिवसांपूर्वी वॉर्नरचा चेंडू डोक्याला लागला होता.

जयकिशन हा भारतीय वंशाचा ब्रिटीश वेगवान गोलंदाज आहे. त्याला 8 जूनला ऑस्ट्रेलिया संघाच्या सराव सत्रात डेव्हिड वॉर्नरने मारलेला एक चेंडू डोक्याला लागला होता. त्यानंतर जयकिशन जमिनीवर कोसळला होता. त्याला खाली पडलेले पाहुन लगेचच वैद्यकीय टीमने मैदानावर येऊन त्याच्यावर उपचार केले होते.

तसेच जोपर्यंत मैदानावर किशनवर उपचार सुरु होते तोपर्यंत वॉर्नर त्याच्या बाजूला बसून होता.  किशनला त्यानंतर लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. पण त्यानंतर वॉर्नरने त्यादिवशी सराव लगेचच थांबवला होता.

3 दिवस जयकिशन हॉस्पिटलमध्ये होता. त्याचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यानंतर त्याला कोणतीही गंभीर इजा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यानंतर आज जयकिशन त्याच्या आईबरोबर द ओव्हल मैदानावर वॉर्नरला भेटला. यावेळी वॉर्नरने त्याच्या आईचीही भेट घेतली. तसेच त्याला ऑस्ट्रेलियाची स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली. याचा व्हिडिओ आयसीसी विश्वचषकाच्या ट्विटरवर तसेच अधिकृत वेबसाईटवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये बोलताना जयकिशन म्हणाला, ‘डेव्हिड वॉर्नरने मला ही त्याची जर्सी दिली आहे. त्याचे खरचं कौतुक आहे. मला वॉर्नरने मारलेला चेंडू डोक्याला लागला होता. पण आनंद आहे की मी इथे उभा आहे. आशा आहे की मी लवकरच मैदानात पुनरागमन करेल.’

‘माझे व्यावसायिक क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न आहे. आशा आहे की माझा प्रवास पुन्हा सुरु होईल. आता थोडा वेळ मिळाला आहे आणि मी विश्वचषकाची मजा घेणार आहे.’

https://twitter.com/cricketworldcup/status/1139846180907565056

https://twitter.com/cricketworldcup/status/1139829655463088128

महत्त्वाच्या बातम्या –

चाचा शिकागो यांनी मानले एमएस धोनीचे आभार, जाणून घ्या कारण

विश्वचषक २०१९: श्रीलंका संघाने केले गंभीर आरोप, आयसीसीकडे केली तक्रार

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी मास्टर ब्लास्टरने टीम इंडियाला दिला खास सल्ला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment