ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर सध्या चर्चेत आहे. वॉर्नर आणि वॉर्नरने 2018 साली चेंडूची झेडझाड केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्यासह इतर दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू चेंडूशी छेडछाड करताना आढळले होते. स्टीव स्मिथ आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट देखील यावेळी वॉर्नरसह दोषी होते, मात्र एकट्या वॉर्नवर कर्णधारपदासाठी अजीवन बंदी घातली गेली. याच पार्श्वभूमीवर सध्या त्याने एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे, जी चर्चेचा विषय ठरताना दिसते.
2018 साली ऑस्ट्रेलिया संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाटी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता. मालिकेतील तिसरा कसोटी सामना केपटाउनमध्ये खेळला गेला. हा तोच सामना होता, ज्यामध्ये डेविड वॉर्नर (David Warner) चेंडूशी छेडछाड करताना सापडला होता. वॉर्नर आणि स्टीव स्मिथ () यांच्यावर या प्रकरणानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून एक वर्षांची बंदी घातली गेली. तसेच सलामीवीर कॅमरून बॅनक्राफ्ट याला सहा महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर ठेवले गेले होते. हा सर्व प्रकार स्मिथच्या सांगण्यावरून झाल्याचे अनेकदा सांगितले गेले. मात्र, परिस्थिती अशी आहे की, स्मिथ सध्या ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करू शकतो. पण वॉर्नवरील कर्णधारपदाची बंदी अद्याप उढवली गेली नाहीये.
याच पार्श्वभूमीवर मागच्या काही वर्षांमध्ये अनेकदा वॉर्नववरील नेतृत्वाची बंदी उढवण्यासाठी अनेकदा मागणी होत आली आहे. संघातील खेळाडू आणि वॉर्नरचे कुटुंब यांनीही त्याला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, यासाठी मागणी केली आहे. असे असले तरी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया मात्र यासाठी अद्याप तयार नाही, असेच दिसते. संघाचे कर्णधारपद मिळण्यासाठी वॉर्नरने अर्ज देखील केली होता. पण आता त्याने कर्णधार बनण्यासाठी केलेा अर्ज मागे घेतला आहे. हा अर्ज मागे घेण्यामागचे कारणा आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या रिव्यू पॅनलकडून कोणत्या कोणत्या अडचणींचा समना करावा लागला, याविषयी माहिती दिली. यासाठी वॉर्नने पाच पाणांची सविस्तर सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.
https://www.instagram.com/p/Cl25OetrjD3/?utm_source=ig_web_copy_link
पोस्टमध्ये त्याने क्रिकेट बोर्डाकडून मिळणारी वागणूक चुकीची असल्याचा आरोप केला. वॉर्नरला कठीण काळात पत्नी आणि कुटुंबीयांनी नेहमी साथ दिली, असेही त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. बोर्ड माझी सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वॉर्नला वाटत आहे आणि त्याने पोस्टमध्ये याविषयी सविस्तर लिहिले देखील आहे. वॉर्नरच्या मते बोर्डाकडून त्याला ज्या पद्धतीने वागणूक मिळत आहे, या सर्व गोष्टी त्याचे कुटुंबीय आणि मित्रांसाठी त्रासदायक आहेत. याच पार्श्वभूमीवर त्याने कर्णधारपदासाठी स्वतःची दावेदारी मागे घेतली आहे.
वॉर्नरच्या या पोस्टवर त्याची पत्नी कॅन्डी वॉर्नर हिने कमेंट करून प्रतिक्रिया दिली आहे. कॅन्डीने या पोस्टवर ह्रदयाचे इमोजी पोस्ट करत वॉर्नरला समर्थन दिले आहे. संघ सहकारी मार्कन स्टॉयनिस यानेही वॉर्नरच्या पोस्टवर रिएक्शन प्रतिक्रिया दिली. ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने देखील वॉर्नरला कर्णधारपदाची संधी मिळावी, यासाठी काही महिन्यांपूर्वी समर्थन दिले होते. दरम्यान ही पोस्ट करण्याआधी वॉर्नरने मंगळवारी (6 डिसेंबर) देखील एक खास पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये सिंहाचा फोटो शेअर केला असून त्यावर, “कुत्र्यांना भुंकूद्या, सिंह अजूनही राजा आहे” असे लिहिले होते. वॉर्नरची ही पोस्ट देखील चांगलीच व्हायरल झाली होती.
https://www.instagram.com/p/ClzZgP6SDz1/?utm_source=ig_web_copy_link
(David Warner has taken aim at Cricket Australia by withdrawing his bid for the captaincy.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मेहदी हसनच्या शतकामुळे बांगलादेशने उभारला 271 धावांचा डोंगर, भारत करणार का पार?
कॅच घेताना रोहित जखमी! झेल तर सुटलाच, पण बोटातून निघाले रक्त; टाके पडण्याची शक्यता