मार्च महिन्यात दक्षिण अफ्रिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी एक वर्षाच्या बंदीची शिक्षा झालेल्या डेव्हिड वार्नरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार पुनरागमन केले आहे.
ब्रिस्बेन येथील एलन बॉर्डर ओव्हल मैदानावर वार्नरने ऑस्ट्रेलिया नॅशनल हाय परफॉर्मेंस संघाविरोधात झालेल्या टी-20 सामन्यात 18 षटकारांच्या सहाय्याने 130 धावांची तुफानी पारी खेळला.
डेली मेल या संकेतस्थळाशी बोलताना या सामन्यासाठी उपस्थित असलेल्या काही प्रेक्षकांनी सांगितले की,”वार्नर खूपच आक्रमक फटके मारत होता. त्यातील काही फटके थेट मैदानाबाहेर मारले. आम्हाला वाटत नव्हते की, वार्नर तीन महिन्यानंतर बॅटिंग करतोय.”
एका प्रेक्षकाच्या मते तर त्याने १८ षटकार मारले त्यातील तब्बल ९ मैदानाबाहेर गेले.
बॉल छेडछाड प्रकरणी स्मिथ-वार्नर यांना एक वर्षाची तर बॅनक्रॉफ्ट याला नऊ महिन्यांची शिक्षा झाली आहे. या तिघांनाही फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यावर बंदी आहे. ते जगभरातील लीग स्पर्धा आणि देशांतर्गत मात्र खेळू शकतात.
28 जूनपासून कॅनडा येथील ग्लोबस टी-20 लिगमध्ये वार्नर आणि स्मिथ सहभागी होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–फुटबाॅलप्रेमापोटी क्रिकेटर रोहित शर्मा पत्नी रितीकासह थेट रशियाला
–टाॅप ५- फिफा विश्वचषक आणि क्रिकेट विश्वचषकातील हे आहेत ५ मोठे फरक