वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 24वा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स संघात खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर याने चमकदार कामगिरी करत तडाखेबंद शतक झळकावले आहे. संघाची धावसंख्या 250च्या पार गेली आहे. हे वॉर्नरचे विश्वचषक 2023मधील दुसरे शतक आहे.
सलामीवीर वॉर्नरचे विश्वचषक इतिहासातील सहावे शतक
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत संघाचे स्टार खेळाडू डेविड वॉर्नर (David Warner) आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शानदार फटकेबाजी केली. झाले असे की, डावाची सुरुवात करण्यासाठी मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर उतरले होते. मात्र, मार्शच्या रूपात ऑस्ट्रेलियाला 28 धावांवरच पहिला धक्का बसला. लोगन व्हॅन बीकने त्याला चौथ्या षटकातील पाचव्या चेंडूवर कॉलिन एकरमनच्या हातून झेलबाद केले.
मात्र, तिथून पुढे वॉर्नरने संघाचा डाव सावरत शतक साकारले. त्याने 91 चेंडूत 104 धावांची खेळी करत शतक झळकावले. त्याच्या खेळीत 3 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. हे वॉर्नरचे विश्वचषक इतिहासातील सहावे शतक ठरले. तसेच, एकूण वनडे कारकीर्दीतील हे 22वे शतक आहे. या विश्वचषकात वॉर्नरने आपले पहिले शतक पाकिस्तानविरुद्ध बंगळुरू येथे केले होते. यावेळी त्याने 124 चेंडूत 163 धावांची धावांची दीडशतकी खेळी केली होती. या खेळीत 9 षटकार आणि 14 चौकारांचा समावेश होता.
वॉर्नरच्या 1300हून अधिक धावा
वॉर्नरने या शतकासह विश्वचषक 2023 स्पर्धेत 1300 धावाही पूर्ण केल्या. त्याने हा टप्पा 23 सामन्यात पूर्ण केला. त्याच्या नावावर यादरम्यान 4 अर्धशतके आणि 6 शतकांची नोंद आहे.
स्मिथसोबत शतकी भागीदारी
मार्श बाद झाल्यानंतर स्मिथ आणि वॉर्नर यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 118 चेंडूत 132 धावांची शानदार शतकी भागीदारी झाली. स्मिथ 68 चेंडूत 71 धावांची खेळी केली. यामध्ये 1 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. (david warner hit century against netherlands in odi world cup 2023)
हेही वाचा-
अफगाणिस्तानच्या विजयावर धमाकेदार डान्स करणाऱ्या इरफानला मिळाली खास भेट, इंस्टावरून दिली माहिती
‘हा कुठला नंबर 1, ज्याला सरळ सिक्स…’, बाबरच्या फलंदाजीवर माजी दिग्गजाची तिखट प्रतिक्रिया