वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांना पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना पहिल्या सामन्यात भारतीय संघाने, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पराभवाचा धक्का दिला. मात्र, तिसऱ्या सामन्यता त्यांनी श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट्सने विजय साकारला. आता त्यांचा चौथा सामना गुरुवारी (दि. 20 ऑक्टोबर) पाकिस्तानविरुद्ध बंगळुरू येथे सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नर चमकला. त्याने खणखणीत शतक झळकावले. त्याच्या शतकामुळे ऑस्ट्रेलिया संघ 200 धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला.
वॉर्नरचे जबरदस्त शतक
डेविड वॉर्नर (David Warner) याने सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत पाकिस्तानी गोलंदाजांना घाम फोडला. त्याने या सामन्यात 85 चेंडूत 100 धावा करत शतक झळकावले. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 6 षटकार आणि 7 चौकारांचाही पाऊस पडला. हे वॉर्नरचे पाकिस्तानविरुद्धचे सलग चौथे शतक ठरले. तसेच, वनडे विश्वचषकाच्या इतिहासातील पाचवे शतक ठरले. वनडे कारकीर्दीतील 21वे शतक ठरले.
HUNDRED BY DAVID WARNER….!!!
4th consecutive century by David Warner against Pakistan. He loves dominating Pakistani bowlers, a true legend of the game. pic.twitter.com/jcm72JTBGp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 20, 2023
मार्शनेही ठोकले शतक
विशेष म्हणजे, वॉर्नरने 31वे षटक टाकत असलेल्या मोहम्मद नवाज याच्या चौथ्या चेंडूवर 1 धाव घेत शतक साजरे केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याचा सलामी जोडीदार मिचेल मार्श (Mitchell Marsh) यानेही शानदार चौकार मारत 100 चेंडूत 101 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 6 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. हे त्याचे वनडे कारकीर्दीतील दुसरे शतक ठरले. खास बाब अशी की, मार्श आज त्याचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे.
ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत
वॉर्नर आणि मार्श यांनी शतक करताच दोघांमध्ये द्विशतकी भागीदारी झाली. त्यांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलिया संघही मजबूत स्थितीत आला. ऑस्ट्रेलियाने 31 षटकाअखेर धावफलकावर एकही विकेट न गमावता तब्बल 214 धावा लावल्या. (David warner hit century against pakistan in world cup 2023 18th match)
हेही वाचा-
‘आम्ही चुकलो, पण जग संपलं नाही…’, भारताविरुद्धचा पराभव पाकिस्तानी खेळाडूच्या जिव्हारी
थांबा! वाइड बॉलसाठी अंपायरवर साधताय निशाणा? आधी ICCचा ‘हा’ नियम काय सांगतो वाचाच