क्रिकेटमध्ये खेळासोबत काहीना काही मनोरंजनाच्या गोष्टी घडत असतात. मग ते फोटो असो, व्हिडिओ असो किंवा अजून काही. खेळाडू विरंगुळा मानून काही तरी सोशल मिडियावर शेअर करत असतात. असाच एक किस्सा घडलाय तो म्हणजे सनरायजर्स हैदराबाद संघातील डेविड वॉर्नर आणि केन विलियमसन यांच्यात. त्यांच्या एका मजेशीर संभाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
सनरायजर्स हैदराबादने आईपीएलच्या पहिल्या सत्राचे एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये सध्याचा हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन आणि माजी कर्णधार डेविड वॉर्नर ‘माइंड लिंक्स’ नावाचा खेळ खेळत आहे. ज्यामध्ये दोघांच्या कानात एक संगीत वाजवले गेले आहे. ज्यामुळे त्यांना एकमेकांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही.
खेळ खेळताना केन विलियम्सनला, डेविड वॉर्नरकडून पहिला प्रश्न विचारण्यात आला की, संघात सर्वात उंच खेळाडू कोण आहे तर त्याचे उत्तर ‘जेसन होल्डर’ चे नाव घेतले, जे बरोबर होते. त्यानंतर केन विलियम्सनने, डेविड वॉर्नरला एक प्रश्न केला की, ‘मिशन इम्पॉसिबल’ चित्रपटाचा अभिनेता कोण आहे, त्याचे उत्तर डेविड वॉर्नरने ‘ग्रेवीटी’ असे दिले.
डेविड वॉर्नरच्या उत्तरानंतर त्याने केन विलियम्सनला प्रश्न केला की, ताज महाल कुठल्या ठिकाणी आहे. त्याचे उत्तर केन विलियम्सनने ‘बिर्याणी’ असे उत्तर दिले. दुसरा प्रश्न तर अजून मजेशीर होता, पुन्हा डेविड वॉर्नरने केन विलियमसनला प्रश्न केला की, एका हैदराबादी डिशचे नाव सांगा तर, त्याचे उत्तर केन विलियम्सनने ‘सचिन तेंडुलकर’ असे दिले.
डेविड वॉर्नरने केन विलियम्सनला शेवटचा प्रश्न केला की, कुठल्या फलंदाजाने शतकांचे शतक केले आहेत. शेवटी केन विलियमसनने या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले ते म्हणजे ‘सचिन तेंडुलकर’.
Music Blaring 🎵
Questions being asked ❓
Need to match the answers correctly ✅How many can Kane & @davidwarner31 get right? 🤔
Watch this episode of Mind Link 💡 to find out!#OrangeArmy #OrangeOrNothing #SRH pic.twitter.com/Yu7h94BMb4
— SunRisers Hyderabad (@SunRisers) June 16, 2021
आयपीएल २०२१ सत्रात सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रदर्शन खूप खराब होते. त्यामुळे सनरायजर्स हैदराबाद कमिटीने चालू स्पर्धेत डेविड वॉर्नरला कर्णधार पदावरून काढून टाकले आणि नवीन कर्णधारपद केन विलियम्सनला देण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC फायनलसाठी वासिम जाफरने निवडली भारताची ‘प्लेइंग ११’, पाच गोलंदाजांना दिले स्थान
मेहनतीला पर्याय नाही! WTC च्या अंतिम सामन्यापूर्वी आर अश्विन करतोय कसून सराव, व्हिडिओ व्हायरल
अमेरिका संधीचे प्रवेशद्वार! स्मित पटेलनंतर ‘हा’ खेळाडूही दिसणार अमेरिकेत क्रिकेट खेळताना