ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेविड वॉर्नर व भारताचे नाते अधिकच घट्ट होताना दिसत आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करणाऱ्या वॉर्नरचे भारतात असंख्य चाहते आहेत. वॉर्नरदेखील सतत भारतीयांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. वॉर्नरने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सुप्रसिद्ध भारतीय अभिनेते बिग- बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या लूकमधील एक व्हिडिओ शेअर केला.
वॉर्नर दिसला होता बाहुबलीच्या लूकमध्ये
वॉर्नरने कोरोना लॉकडाउनच्या काळात टिकटॉकच्या माध्यमातून, अनेक भारतीय गाण्यांवर अभिनय करत चाहत्यांचे मनोरंजन केले होते. सध्या तो भारतीय सिनेमांच्या प्रेमात पडला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने प्रसिद्ध भारतीय चित्रपट बाहुबलीच्या लूकमधील एक छायाचित्र प्रसिद्ध केले होते. त्यानंतर, वॉरियर या भूमिकेची देखील त्याने नक्कल केलेली.
आता बनला बिग-बी
वॉर्नरने एका विशिष्ट ॲपच्या सहाय्याने स्वतःच्या चेहर्याला बिग-बी या नावाने ओळखले जाणारे जगप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचा लूक दिलेला आहे. वॉर्नरने या व्हिडिओमध्ये पांढरा शर्ट, काळा सूट आणि टाई घातलेली दिसून येतेय. त्याची पांढरी दाढी, चष्मा आणि केशरचना हुबेहुब अमिताभ यांच्यासारखी दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CH67QxEFWdh/?utm_source=ig_web_copy_link
व्हिडिओखाली टाकले मजेशीर कॅप्शन
या व्हिडिओखाली वॉर्नरने ‘हा अभिनेता कोण आहे आणि चित्रपटाचे नाव काय?’ अशा स्वरूपाचे कॅप्शन टाकले आहे. सोबतच, प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डी नेरोच्या नावाचा हॅशटॅग दिलेला दिसून येतोय. शेवटी त्याने एक हसण्याचा ईमोजी वापरला आहे. वॉर्नरच्या या पोस्टवर चाहत्यांच्या अनेक मजेदार कमेंट्स येत आहेत.
ऑस्ट्रेलियाचा हा विस्फोटक सलामीवीर सतत सोशल मीडियावर व्यस्त असतो. त्याची पत्नी कॅंडीस व दोन मुली यादेखील त्याच्या अनेक व्हिडिओमध्ये दिसून येतात. नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने तिसरे स्थान पटकावले होते. वॉर्नर २७ तारखेपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
आश्चर्यकारक! वॉर्नर कधीच नाही खेळणार बीबीएल? मांडली आपली समस्या
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये वॉर्नरसोबत ‘या’ फलंदाजाने करावी सलामीला फलंदाजी, पाँटिंगने व्यक्त केले मत
डेविड वॉर्नरच्या मधल्या मुलीला आवडतो भारताचा ‘हा’ क्रिकेटपटू, पत्नी कँडिसने केला खुलासा