---Advertisement---

वॉर्नरने बलाढ्य वेस्ट इंडिजला दिवसा दाखवले चांदणे, नाबाद ८९ धावा चोपत केला मोठा किर्तीमान

On: रविवार, नोव्हेंबर 7, 2021 12:19 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात शनिवार रोजी (०६ नोव्हेंबर) टी२० विश्वचषक २०२१ मधील ३८ वा सामना पार पडला. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही गोलंदाजी आणि फलंदाजीत धडाकेबाज कामगिरी करत ८ विकेट्सने हा महत्त्वपूर्ण सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत पोहोचवण्यात त्यांचा सलामीवीर डेविड वॉर्नर याने महत्त्वाची भूमिका बजावली. वॉर्नरने या सामन्यात सर्वाधिक धावा फटकावल्या. यासह त्याने मोठा किर्तीमानही आपल्या नावे केला आहे.

वेस्ट इंडिज संघाविरुद्ध वॉर्नरने सलामीला फलंदाजीला येत नाबाद ८९ धावांची प्रशंसनीय खेळी खेळली. ५६ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा चोपल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १५८.९३ इतका राहिला. ही ऑस्ट्रेलियाकडून कोणत्या फलंदाजाने टी२० विश्वचषकात खेळलेली सर्वात मोठी खेळी राहिली. यासह वॉर्नरच्या खात्यात टी२० विश्वचषकात सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे.

यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कॅमरॉन व्हाईटच्या नावे हा विक्रम होता. त्याने टी२० विश्वचषकात नाबाद ८५ धावा करत हा विक्रम नोंदवला होता. परंतु आता वॉर्नर त्याच्याही पुढे गेला आहे. तर या विक्रमाच्या यादीत शेन वॉटसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने टी२० विश्वचषकात ८१ धावांची खेळी खेळली होती.

टी२० विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठी वैयक्तिक खेळी खेळणारे ३ फलंदाज-
८९* धावा – डेविड वॉर्नर
८५* धाव – कॅमरॉन व्हाईट
८१ धावा – शेन वॉटसन

वॉर्नरव्यतिरिक्त या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मिशेल मार्शनेही शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ३२ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. वॉर्नर आणि मार्शमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १२४ धावांची शतकीय भागिदारीही झाली.

महत्त्वाच्या बातम्या-

अफगाणिस्तानच्या खांद्यावर भारताचे ओझे; पण न्यूझीलंड जिंकल्यास काय? जडेजा म्हणाला, ‘बॅग भरून…’

ब्रावोसह ‘या’ विंडीज क्रिकेटरचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा? ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’

पाकिस्ताननंतर इंग्लंड, ऑस्ट्रेलियाने मिळवले उपांत्य फेरीचे तिकीट; चौथ्या स्थानासाठी भारतासह ‘हे’ २ संघ शर्यतीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---