---Advertisement---

फलंदाजीतून धावांचा पाऊस पाडणारा वॉर्नर टेनिसमध्ये आहे पटाईत; व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ‘मी चांगलाच खेळतो…’

On: शनिवार, मार्च 12, 2022 12:56 AM
David-Warner
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघ २४ वर्षानंतर पाकिस्तान (PAK VS AUS) दौऱ्यावर असून या दोन संघातील दुसरी कसोटी शनिवारपासून (१२ मार्च) कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. रावळपिंडीत खेळवण्यात आलेली दोन्ही संघांमधील पहिली कसोटी अनिर्णित राहिली. आता दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ मैदानावर सराव करत आहेत. क्रिकेट व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन खेळाडू स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी इतर खेळसुद्धा खेळत आहेत. ऑस्ट्रेलिया संघाचे फलंदाज शुक्रवारी (११ मार्च) टेनिस खेळताना दिसले. डेविड वॉर्नर तसेच पाहुण्या संघाचे तीन खेळाडूही टेनिस खेळताना दिसले.

वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो संघसहकाऱ्यांसोबत टेनिस खेळताना दिसत आहे. यामध्ये उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशेनही हातात रॅकेट घेतलेले दिसत आहेत. वॉर्नरने पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्ही मोकळ्या वेळेत आणखी काय करणार? त्यामुळे आम्ही थोडे टेनिस खेळायचे ठरवले आहे. मी चांगला खेळतोच, परंतु हे तिघेही खूप छान खेळतात.”

https://www.instagram.com/p/Ca9mzFYls2w/?utm_source=ig_embed&ig_rid=aae2ef79-92d8-4117-bf75-0eb7c8c897f9

पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला ऑस्ट्रेलियन संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर या मालिकेनंतर वॉर्नर ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. तिकडे तो शेन वॉर्नच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहे. यामुळे वॉर्नर आयपीएल २०२२ च्या पहिल्या काही सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळू शकणार नाही. कसोटी मालिकेनंतर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ एप्रिलला एकमेव टी२० सामनाही खेळायला जाणार आहे.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये १२ ते १६ मार्चदरम्यान दुसरी कसोटी कराची येथे खेळली जाणार आहे, तर २१ ते २५ मार्च दरम्यान लाहोर येथे तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. यानंतर पहिला, दुसरा, तिसरा एकदिवसीय सामना रावळपिंडी येथे अनुक्रमे २९ मार्च, ३१ मार्च आणि २ एप्रिल रोजी खेळले जाणार आहेत. तसेच ५ एप्रिलला एकमेव टी२० रावळपिंडी येथे पार पडणार आहे.

याव्यतिरिक्त आयपीएलचा पहिला सामना २६ मार्चला मुंबई येथे खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक बनल्यानंतर मलिंगाची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आयपीएलमध्ये पुनरागमन…’

केकेआरचा स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर; आता ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूला केले ताफ्यात सामील

सलूनमध्ये काम करणाऱ्याच्या मुलाचा सोशल मीडियावर राडा; मिळाली थेट ‘मास्टर ब्लास्टर’सोबत प्रॅक्टिस करण्याची संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---