सोमवारी(29 एप्रिल) सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात आयपीएल 2019चा 48 वा सामना पार पडला. या सामन्यात हैद्राबादने 45 धावांनी विजय मिळवला. हैद्राबादच्या या विजयात आक्रमक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.
हा सामना वॉर्नरचा आयपीएल 2019 मधील अखेरचा सामना होता. त्याने त्याच्या या अखेरच्या सामन्यात 56 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार मारताना 81 धावांची खेळी करत आयपीएल 2019मधील त्याच्या प्रवासाचा शेवटही आनंददायी केला.
या सामन्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने हैद्राबाद संघाने यावर्षी त्याच्या पुनरागमनानंतर तसेच मागीलवर्षी बंदी असतानाही त्याला दिलेल्या पांठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
त्याने या पोस्टमध्ये हैद्राबादच्या संघसहकाऱ्याबरोबरील तसेच स्टाफबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘सनरायझर्स हैद्राबादच्या कुटुंबाने दिलेल्या पाठिंब्यासाठी मी शब्दात कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही. फक्त या मोसमातच नाही तर मागील मोसमातही मला चांगला पाठिंबा मिळाला.’
‘बऱ्याच काळाच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा संघात येणे मस्त होते. संघमालक , सपोर्ट स्टाफ, खेळाडू, सोशल मीडिया टीम आणि चाहते या सर्वांचे मी आभार मानतो. त्यांनी माझे आनंदाने स्वागत केले. मी परत येऊन धावा करताना आनंद घेतला. पुढील स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा.’
वॉर्नरसाठी यावर्षीचा आयपीएल मोसम खास ठरला आहे. तो सध्या आयपीएल 2019मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील आहे. त्याने 12 सामन्यात 69.20 सरासरीने 692 धावा केल्या आहेत. यात त्याने 1 शतक आणि 8 अर्धशतके केली आहेत.
2019 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा 2 मे पासून ट्रेनिंग कॅम्प सुरु होणार आहे. त्यामुळे विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघात संधी मिळालेले खेळाडू 2 मे आधी पुन्हा ऑस्ट्रेलियाला परतणार आहेत. त्यामुळे वॉर्नरलाही मायदेशी परतावे लागले आहे.
https://www.instagram.com/p/Bw3c_63pwy6/?utm_source=ig_twitter_share&igshid=ps4xjxgseqen
I can not express my gratitude enough to the @SunRisers family for your support, not just this season but also for the last year. It’s been a long time waiting but it was great to be back… https://t.co/zhfY5HA7jS
— David Warner (@davidwarner31) April 30, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–आयपीएल २०१९: रिषभ पंतने संगकाराला मागे टाकत केला मोठा कारनामा
–इंग्लंडला मोठा धक्का, विश्वचषकातून हा खेळाडू झाला बाहेर
–रिषभ पंतची विकेटकिपिंगमध्ये कमाल, घेतले हे दोन अफलातून झेल, पहा व्हिडिओ






